
छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या शालेय विभागीय १४ वर्षांखालील तेंग सुडो स्पर्धेत आदित्य नरोडे याने सुवर्णपदक पटकावले. या सुवर्ण कामगिरीमुळे आदित्यची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत ४२ किलो वजन गटाच्या तेंगसुडो स्पर्धेत मुलांच्या गटात रायझिंग स्टार स्कूलच्या आदित्य सुनील नरोडे याने सुवर्ण पदक प्राप्त केले. शालेय राज्यस्तरीय तेंग सुडो स्पर्धेसाठी आदित्य हा पात्र ठरला आहे.
आदित्य नरोडे याला क्रीडा शिक्षक संतोष आवचार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या घवघवीत यशाबद्दल तेजराव बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष निकम, सचिव अरुण निकम, मुख्याध्यापिका दीपाली वाकळे, उपमुख्याध्यापक संदीप चव्हाण, स्वाती निकम, वर्ग शिक्षिका रुपाली राणे व इतर शिक्षकांनी आदित्यचे अभिनंदन केले तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.