
अहिल्यानगर : मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ, उदयपूर (राजस्थान) येथे होणाऱ्या मुलींच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंबिका वाटाडे हिची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघात निवड झाली आहे.
आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी अंबिकाची सलग चौथ्यांदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रिकेट संघात निवड झाली आहे. या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बबन चौरे यांनी अंबिकाचे अभिनंदन केले. अंबिकाला शारीरिक शिक्षण संचालक डॉ विजय देशमुख, प्रा सचिन शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभले आहे.