
जल हे जीवन आहे ते मृत्यूचे कारण ठरु नये म्हणून राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन १ जानेवारीपासून राबविण्यात येत आहे. २१ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय जलतरण साक्षरता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. कारण २१ जानेवारी हा जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा जन्म दिन आहे. त्याला सबळ कारण व पुरावा आहे. जलतरण साक्षरतेच्या संदर्भातील हे पहिले-वहिले अभियान असणार आहे.
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची जयंती २१ जानेवारी हा दिवस
राष्ट्रीय जलतरण साक्षरता दिन म्हणून पाळण्यात येणार आहे. कारण
जगतगुरु तुकोबाराया म्हणतात
हा गे आलों कोणी
म्हणे बुडतिया ।
तेणें किती तया
बळ चढे ॥
अर्थ असा की
पाण्यात बुडत असणाऱ्या माणसाला हे बघ, मी आलोय एवढं नुसतं म्हणाल तरी त्यामुळे त्याची ताकद किती वाढते. संत तुकाराम महाराज म्हणूनच संतांची वाणी प्रमाण मानून राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन यावर्षीचे ब्रीद वाक्य आहे.

आवाज दो ! म्हणजे एकमेकांना जागे करा. जागृत करा. माहिती द्या. जलतरण साक्षर करा. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार जगभरात दरवर्षी सुमारे ३ लाख लोक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडतात. म्हणजे दररोज साधारण ८०० ते ८५० लोक दररोज कोणत्याना कोणत्या कारणाने कुठेना कुठे पाण्यात बुडतात व मरण पावतात. ही आकडेवारी खरोखरच भयावह आहे. यामध्ये शालेय विद्यार्थी आणि महाविद्यायालयीन तरुणांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ही चिंतेची गोष्ट आहे.
जगात एकून होणाऱ्या अपघाती मृत्यूमध्ये तिसरा क्रमांक हा पाण्यात बुडून होणाऱ्या अपघाताचा आहे. पण या विषयाकडे अजूनपर्यंत गांभिर्याने बघितले गेले नाही हे दुर्देव आहे. हा विषय दुर्लक्षीत राहिला आहे अशी ही खंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनने व्यक्त केली आहे .
मे २०१७ मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनने प्रिव्हेंटिंग-डूबिंग : एक अमलबजावणी’ मार्गदर्शक जारी केले आहे. हे प्रकाशन जागतिक अहवालावर आधारित आहे आणि बुडण्यापासून बचाव करणाऱ्याना बुडणे प्रतिबंधक हस्तक्षेप कसे लागू करावे याबद्दल ठोस मार्गदर्शन प्रदान करते. एप्रिल २०२१ मध्ये यूएन जनरल असेम्बलीने बुडण्यापासून बचाव करण्यासाठी पहिला-वहिला ठराव स्वीकारला.
ज्यामध्ये शाश्वत विकास, सामाजिक समता, शहरी आरोग्य, हवामान बदल, आपत्ती जोखीम कमी करणे आणि आरोग्य आणि कल्याण यासंबंधीचे दुवे हायलाइट केले गेले. ठरावाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन संयुक्त राष्ट्र प्रणालीमध्ये बहु क्षेत्रीय बुडणे प्रतिबंधक प्रयत्नांचे समन्वय साधण्याचे आवाहन केले आणि २५ जुलै हा दिवस जागतिक बुडणे प्रतिबंधक दिवस म्हणून घोषित केला.
विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील व मागास देशांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनच्या म्हणण्यानुसार कारण या ठिकाणी सोई-सुविधांचा मोठा अभाव आहे. अति महत्वाचे..भले ही भौतिक सुविधांचा अभाव भारतामध्ये आहे
पण वैचारिक वारसा अत्यंत समृद्ध आहे. त्याचे जीवंत व शाश्वत उदाहरण म्हणजे सोळाव्या शतकात जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील या ओळी…
हा गे आलों
कोणी म्हणे बुडतिया ।
तेणें किती तया बळ चढे ॥
याचा अर्थ असा की पाण्यात बुडत असणाऱ्या व्यक्तीला हे बघ, आलोय एवढं नुसतं म्हटलं तरी त्यामुळे त्याची ताकद किती वाढते ।
जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी अनेक वर्षांपूर्वी हा अभंग लिहून ठेवला आहे. आजच्या काळात या अभंगाचे अनुकरण करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. परंतु विशेष बाब अशी आहे की
वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनच्या सांगण्या आधी सुमारे ४०० वर्षे अगोदर आपल्याला अभंगाच्या माध्यमातून गुरु मंत्र मिळाला आहे. त्याची सुरवात छत्रपती संभाजीनगर मध्ये २००१ पासूनच शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत जलतरण प्रशिक्षण व जलतरण साक्षरता देण्याचे काम राजेश भोसले यांनी सुरू केले आहे.
जागतिक जलतरण साक्षरतेची कल्पना त्यांनी महान विचावंत व तत्ववेत्ते प्लेटो यांच्या विचारातून घेतली व राबवण्याचा कसोशीने प्रतत्न करत आहेत.
The Person who does not know Swimming is
Uneducated .
– PLATO ( 428-347 BCE)
ज्या व्यक्तीला पोहता येत नाही ती व्यक्ती अशिक्षीत आहे असे प्लुटो म्हणतात. याच विचाराला अभियानाचे स्वरूप देऊन पुढे नेण्यासाठी व जयतरणाचा प्रचार प्रसार व्हावा, मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी, पोहता येत नाही म्हणून कुणाचाही जीव जावू नये, पोहण्या अगोदरच म्हणजे तरणा पूर्वीच जल व जलस्त्रोत याची संपूर्ण माहिती ही प्रत्येक शाळकरी विद्यार्थी व पालक-नागरिकास व्हावी या उद्देशाने
यावर्षी राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन २०२५ राबविण्यात येत आहे.
१ जानेवारीपासून राबविण्यात येणाऱ्या या मिशन अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील शाळेच्या माध्यमातून जलतरण साक्षरतेची संपूर्ण माहिती लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जाणार आहे.
या वर्षी सुरू होणाऱ्या मिशन मध्ये फक्त माहिती देणे, जागृत करणे, मार्गदर्शन करणे एवढेच असणार आहे. केजी टू पीजी शाळा ते महाविद्यालयपर्यंत जल व तरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजावून सांगणे अतिशय महत्वाचे आहे. या मिशनचा महत्वपूर्ण उद्देश हाच आहे. तरणा पूर्वी म्हणजे पोहण्यापूर्वी प्रत्येकाला पाणी म्हणजे जल व जल स्त्रोत यांची माहिती असणे आवश्यक आहे. आड,
विहीर, बारव, नदी, नाला, ओढा, बंधारा, चारी, पाट, तळे, शेततळे,
कट्टा, खदान, डोह, सरोवर, धबधबा, सिंचन प्रकल्प, खाडी, समुद्र इत्यादी स्थानिक कृत्रिम व नैसर्गिक जलसाठे व जलस्त्रोतांची संपूर्ण माहिती प्रत्येक शालेय विद्यार्थी व महाविद्यायालयीन तरुण व नागरीकांपर्यंत पोहचवणे हाच आहे. बुडून होणारे मृत्यू रोखणे व प्रत्येकाला जलतरण साक्षर करणे हा आहे.
– राजेश भोसले, जलतरण साक्षरतेचे संकल्पक, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक, एमजीएम स्पोर्ट्स क्लब, छत्रपती संभाजीनगर. (95279 24646).