छत्रपती संभाजीनगर : वरिष्ठ गट राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगर जिल्हा टेनिक्वाईट संघटनेतर्फे निवड चाचणी आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र टेनिक्वाईट असोशिएशनच्या मान्यतेने उदगीर येथे १७ ते १९ जानेवारी या कालावधीत उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट (मुले व मुली) टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा टेनिक्वाईट संघटनेतर्फे १३ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय टेनिक्वाईट निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन क्रीडा मैदान नाईक नगर, मयुरेश्वर गणपतीच्या पाठीमागे, देवळाई येथे करण्यात आले आहे.
राज्य स्पर्धा वरिष्ठ गटाची असल्यामुळे सर्व खेळाडू निवड चाचणीत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी आवश्यक कागदपत्रांसह संध्याकाळी ४.३० वाजता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९८५०१७०४०५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा संघटनेचे मार्गदर्शक डॉ संदीप जगताप, सचिव डॉ अभिजीत देशमुख यांनी केले आहे.