
जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड : नांदेड येथे महाराष्ट्र अंडर १९ बेसबॉल संघाचे सराव व प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने.अंडर १९ शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. पीपल्स महाविद्यालय नांदेड या ठिकाणी हे शिबीर होत आहे.
१४ ते १८ जानेवारी या कालावधीमध्ये राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आयोजित पूर्व प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या उद्घाटन प्रसंगी सातारा जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे सचिव ज्ञानेश काळे, हौशी बेसबॉल असोसिएशनचे सचिव आनंदा कांबळे, शेख सत्तार, परभणी जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आकाश साबणे, विशाल कदम, ज्ञानेश्वर माने आदी उपस्थित होते.