
छत्रपती संभाजीनगर : जिल्हास्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत कन्नड संघाने वैजापूर संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून आयोजित जिल्हास्तरीय पालक व विद्यार्थी यांची क्रीडा स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील ९ संघांनी सहभाग घेतला होता. व्हॉलीबॉल स्पर्धेत कन्नड मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात वैजापूर संघाला १५-५स १५-२ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावला. कन्नडच्या मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
पारितोषिक वितरण
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक देण्यात आले.
या विजेत्या संघाला तालुका व्हॉलिबॉल क्रीडा मार्गदर्शक प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गटशिक्षण अधिकारी श्रीमाळ, विस्तार अधिकारी डी डी शिंदे, केंद्र प्रमुख बाजीराव ताठे, प्रशालेचे मुखयाध्यापक दिलीप गायकवाड, योगेश मुळे, दिलीप मगर, वनारसे, वैष्णव, वैशाली बोरसे, विक्रम गदळे, दिलीप मगर, छाया बोडखे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या स्पर्धेत पंच म्हणून एजाज शहा, विशाल दांडेकर, अली बाकोदा यांनी काम पाहिले.
विजेते संघ
मुलींचा संघ :श्वेता दिवेकर, ऋतुजा जाधव, शालिनी बोडखे, प्रणाली थेटे, वैष्णवी थेटे, अक्षरा बोडखे, गौरी जठार, फातिमा शेख, कावेरी नागे.
मुलांचा संघ :नयन बोडखे, ओम थेटे, सुशांत थेटे, लखन थेटे, चेतन नागे, प्रणल राठोड, प्रणव राठोड, अजिंक्य गायकवाड.