सेलू : महाराष्ट्र सेपक टकारा असोसिएशन व वर्धा जिल्हा सेपक टकारा असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय ज्युनियर सेपट टकरा स्पर्धा वर्धा येथे १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता परभणी जिल्ह्याचा ज्युनिअर मुले व मुलींचा सेपक टकारा संघ निवडण्यासाठी मंगळवारी (१४ जानेवारी) निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणी जिल्हा संघाची निवड चाचणी मंगळवारी घेण्यात येणार आहे. या निवड चाचणीत शालेय विद्यार्थी, क्लब, मंडळ, तसेच वैयक्तिक खेळाडू सहभागी होऊ शकतात. खेळाडूंची जन्मतारिख एक जानेवारी २००५ नंतरची असावी. खेळाडूंनी जन्माचा दाखला, आधार कार्ड प्रत, दोन फोटो सोबत आणावेत. या निवड चाचणीत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सेलू येथील नूतन विद्यालय मैदानावर दुपारी दोन वाजता निवड चाचणीची सुरुवात होणार आहे. परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन सचिव गणेश माळवे, महमंद इक्बाल, प्रा.नागेश कान्हेकर, सतीश नावाडे, प्रशांत नाईक, संजय भुमकर अनुराग आंमटी (8830073631) यांनी केले आहे.