
नागपूर : राज्यस्तरीय शालेय टेंग सु-डो स्पर्धेत नागपूर विभाग संघाने तिसरा क्रमांक संपादन केला. नागपूर विभाग संघाने या स्पर्धेत एकूण २७ पदकांची कमाई केली.
क्रीडा आणि युवा सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे आणि जिल्हा क्रीडा परिषद धुळे यांच्या वतीने राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, पिंपळनेर, साक्री येथे राज्यस्तरीय शालेय टेंग सु डो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नागपूर विभागातील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ६ सुवर्णपदके, १० रौप्य पदके आणि ११ कांस्य पदके जिंकली. ध्रुव पेठे, श्रावणी शेंडे, ध्रुविका इंगोले, पलक चव्हाण, महक कानुंगो, दिशा चौबे, (सुवर्णपदक) उत्कर्ष उनरकर, स्वर्ण ठवकर, पूर्वी नागदवणे, पार्थ कडूकर, तारुण्य शेंडे, सौम्या खंडाईत, एंजल गेडाम, मंतशा शेख, गरवी रंगारी, इशिका येवले (रौप्य पदक) नित्यश्री गिरी, अर्पित जामगडे, अनन्या वानखेडे, समृद्धी इटनकर, तुषार हातमोडे, लकी रेवतकर, गौरव कानुनगो, ओम चौड़े, सुखद गहूकर, अनुज कवळे यांनी पदके प्राप्त केली.
नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा अधिकारी माया दुबळे आणि नागपूर विभागाचे किरण यादव आणि त्यांचे प्रशिक्षक नरेंद्र बिहार, काजल राऊत, शशांक विश्वकर्मा, सुमित नागदवणे आणि विनोद डहारे यांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.