
व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : मयूर जे, आरिज अंद्राबी सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १८व्या व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत डॉक्टर्स इलेव्हनने आर्किटेक्ट संघावर दहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवत आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात एमआर इलेव्हनने इंडो जर्मन टूल रूम संघाचा चार विकेट राखून पराभव केला. या सामन्यांमध्ये मयूर जे आणि आरिज अंद्राबी यांनी सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. डॉक्टर्स इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आर्किटेक्ट संघाने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात सर्वबाद ७४ असे माफक लक्ष्य उभे केले. त्यानंतर डॉक्टर्स संघाने अवघ्या ६.५ षटकात बिनबाद ७७ धावा फटकावत दहा विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात कार्तिक बाकलीवाल याने ५० धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. कार्तिक बाकलीवालने २२ चेंडूत पाच चौकार व चार षटकार मारले. गिरीश गाडेकर याने १९ चेंडूत २३ धावांची वेगवान खेळी साकारली. गिरीश गाडेकरने दोन उत्तुंग षटकार व दोन चौकार मारले. योगेश सुरकुटलावर याने २७ चेंडूत २३ धावा फटकावल्या. योगेशने दोन चौकार मारले.
दुसऱ्या सामन्यात इंडो जर्मन टूल रूम संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सात बाद १४७ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एमआर इलेव्हनने १५ षटकात सहा बाद १४९ धावा फटकावत चार विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात इंद्रजीत उढाण (४१), शेख वसीम (३६), मीत (३५) यांनी शानदार फलंदाजी केली. गोलंदाजीत आरिज अंद्राबी याने २२ धावांत चार विकेट घेत सामनावीर किताब पटकावला. मीत याने ३८ धावांत तीन आणि हरिवंश यादव याने ५४ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : १) आर्किटेक्ट संघ : १६ षटकात सर्वबाद ७४ (देवाशिष जैस्वाल ७, योगेश सुरकुटलावर २३, विजय अडलाकोंडा ८, वीरेन ११, अक्षय चौधरी ८, मयूर जे ३-१४, मशुदुल सय्यद २-१७, राजेश चौधरी २-१२) पराभूत विरुद्ध डॉक्टर्स इलेव्हन : ६.५ षटकात बिनबाद ७७ (गिरीश गाडेकर नाबाद २३, कार्तिक बाकलीवाल नाबाद ५०). सामनावीर : मयूर जे
२) इंडो जर्मन टूल रूम : २० षटकात सात बाद १४७ (इंद्रजीत उढाण ४१, आदर्श शुक्ला ९, दीपक जगताप ११, मीत ३५, प्रणव पाटील नाबाद २०, इतर २७, आरिज अंद्राबी ४-२२, शमी १-३७) पराभूत विरुद्ध एमआर इलेव्हन : (शेख वसीम ३६, अदनान अहमद १७, मोहम्मद आमेर २५, सय्यद जलिस ९, फिरदी नाबाद २३, सुरज वाघ नाबाद ७, इतर १८, मीत ३-३८, हरिवंश यादव २-५४, अथर्व जाधव १-१७). सामनावीर : आरिज अंद्राबी.