नागपूर विद्यापीठाचा महिला कराटे संघ जाहीर 

  • By admin
  • January 14, 2025
  • 0
  • 129 Views
Spread the love

नागपूर : रोहतक (हरियाणा) येथे १८ ते २१ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कराटे महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी नागपूरच्या आरटीएम विद्यापीठ कराटे महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. 

नागपूर विद्यापीठ कराटे संघात ऋषिका निरंजने, अलिना अन्सारी, तरन्नुम शेख, सुजाता रेवतकर, अचल बोकडे, संजना ठाकूर, रुचिका जगनाडे, कृतिका राठोड, प्रांजल पाटील, अंकिता पाहुणे, तिशा बाकरवाले या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी शाहवर खान व संघ व्यवस्थापक म्हणून डॉ झाकीर खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा संचालक डॉ विशाखा जोशी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *