
१५ जानेवारी रोजी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची १०० वी जयंती साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांचे नाव जगभर पोहचविणारे लेखक संजय दुधाणे यांच्या कार्याची ही गौरवगाथा…
- अभय नंदन, (शिक्षक), राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर.
१९५५-६० च्या दरम्यान कर्नाटक येथून महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे उद्योग व्यवसायासाठी येणारे श्री. विश्वनाथ आप्पा गुदगे यांच्या कुटुंबात १४ जानेवारी १९६२ रोजी जयप्रकाश यांचा जन्म झाला. जयप्रकाशजी यांनी त्यावेळी सरस्वती भुवन महाविद्यालयात बीकॉम पर्यंत शिक्षण घेऊन लगेचच तरुण वयातच व्यावसायिक होण्याचे ठरविले आणि त्यादृष्टीने त्यांनी लगेच आरती ऑटोमोबाईल्स या व्यवसायाची सुरुवात केली. व्यवसायातील बारकावे लक्षात घेत व्यावहारिक ज्ञानाच्या आणि आपल्या सुमधुर मितभाषी बोलण्याच्या जोरावर अल्पावधीतच जयप्रकाशजी यांनी व्यवसायात भरभराट घेतली. पुढे त्यांनी आरती ऑटोमोबाईल सोबतच ट्रॅव्हल्स व कंट्रक्शन या व्यवसायाची सुरुवात केली. असे त्यांनी आजतागायत अनेक व्यवसाय करत ते यशस्वी व्यवसायिक व उद्योजक म्हणून नावारूपास आले. त्यामागे त्यांची अनेक वर्षांची मेहनत व कष्ट घेण्याची धडपड लक्षात येते. जयप्रकाशजी हे उद्योग व्यवसायात पारंगत तर आहेतच त्याचबरोबर ते राजकीय व सामाजिक क्षेत्रात ही तेवढेच सर्वांना सुपरिचीत आहेत. त्यांचे शिवसेना सोबतच भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाई अशा अनेक पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाप्रमाणे अनेक पक्षातील अनेक पदाधिकारी त्यांचे मार्गदर्शन घेत असतात. शिवसेना नेते मा. खासदार चंद्रकांत खैरे साहेबांचे अत्यंत जवळचे विश्वासू म्हणूनही जयप्रकाशजी यांची संपूर्ण शहरात ख्याती आहे. उद्योग व्यवसायासोबतच राजकीय क्षेत्रातही जयप्रकाशजी गुदगे यांना जया शेठ म्हणून आदराने व प्रेमाने संबोधतात.

जयप्रकाशजी यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला तर सन १९८८ पासून ते आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम व कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक चर्चासत्रे, औद्योगिक कार्यशाळा तसेच शहरातील वेगवेगळ्या भागातील समस्या असोत किंवा अडचणी असोत त्या सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न ते सतत करीत असतात. शहरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असो किंवा अन्य प्रश्न असो अशा अनेक वेळी स्वखर्चाने त्यांनी मोफत टँकरद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी संभाजीनगर शहरातील त्यांच्या पिण्याच्या पाणी टंचाईवरील उपाय योजनांची दखल घेऊन स्वतः हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मा. खा. चंद्रकांतजी खैरे यांच्या मार्फत संभाजीनगर शहरातील पाणी पुरवठा टँकरचे उद्घाटन करीत त्यांच्या कामाचे कौतुक व अभिनंदन केले होते. त्यावेळी जयप्रकाशजी यांना शहरात पाणीवाले बाबा म्हणून संबोधले गेले. आजही अनेक होतकरू तरुणांना उद्योग व व्यवसायासाठी तसेच गरीब व कष्टकरी जनमाणसांना ते आर्थिक असो वा अन्य कोणतीही मदत नेहमीच करीत असतात.
उद्योग क्षेत्रात व व्यवसायात असून देखील त्यांनी आपण राहतो त्या शहराचे, समाजाचे व समुदायाचे देणं लागतो या उदांत हेतूने सन १९९७ मध्ये त्यांचे मार्गदर्शक व मित्र शिवसेना नेते मा. खासदार चंद्रकांत खैरे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने त्यावेळी जय महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. संस्था अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत खैरे साहेबांनी विश्वासाने दिलेली संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी आजही ते उत्तमरित्या सांभाळत आहेत. तसेच संस्थेच्या राजे संभाजी भोसले सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तसेच दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालय यांच्या उभारणीत व शैक्षणिक वाटचालीत मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत.
अनेक वर्ष उद्योग-व्यवसायासह विविध क्षेत्रात कार्यरत असूनही स्वतःला प्रसिद्धी व प्रतिष्ठा यापासून कोसो दूर ठेवणारे जयप्रकाशजी आजही प्रत्येक कार्य हे आत्म समाधानासाठी व जनमाणसाच्या उन्नतीसाठी तेवढ्याच जोमाने करीत आहेत. अशा औद्योगिक क्षेत्रासोबतच राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बहुआयामी व्यक्तिमत्व आमचे प्रेरणास्थान, मार्गदर्शक आदरणीय जयप्रकाशजी गुदगे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील कार्यास सदिच्छा…