छत्रपती संभाजीनगर : टीआरएस फाऊंडेशनतर्फे डॉक्टरांसाठी डॉक्टर्स बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ओपन आणि महिला अशा दोन गटात होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने टीआरएस फाऊंडेशनतर्फे ही स्पर्धा चेस लँड, चित्रकूट व्हॅली, पाटोदा जवळ या ठिकाणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.
या स्पर्धेतील ओपन गटातील विजेत्याला किंग ट्रॉफी, उपविजेत्याला रूक ट्रॉफी, तिसरा क्रमांक संपादन करणाऱ्या खेळाडूला बिशप ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. महिला गटात प्रथम क्वीन ट्रॉफी, द्वितीय नाईट ट्रॉफी, तृतीय पॉन ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व डॉक्टर्स सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी ओपन व महिला गटासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. नाव नोंदणी १७ जानेवारीपर्यंत करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२२५०८७३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.