
अमरावती : अमरावती विभागाच्या वतीने मोटिवेशन टेनिस अकादमी येथे नियमित सराव करीत असलेल्या अद्वैत विजय रायबोले आणि क्रिश मनोज ठाकरे यांनी टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
पुसद येथील जे जे क्लब या ठिकाणी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने टेनिस स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या अद्वैत रायबोले याने १२ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले. तसेच सेंट झेव्हियर्स कॅथेड्रल स्कूलच्या क्रिश ठाकरे याने १० वर्षांखालील गटाचे अजिंक्यपद संपादन केले.
सार्वजनिक पाटबंधारे विभाग अमरावती विभागाचे मुख्य अभियंता गिरीष जोशी यांनी दोन्ही टेनिसपटूंचे अभिनंदन करून सन्मान केला आहे. दोन्ही खेळाडूंचे प्रशिक्षक मुकेश पारतकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच विजय रायबोले, पुष्पाताई रायबोले, मनोज ठाकरे, मनिषा ठाकरे यांनी प्रशिक्षक मुकेश पारतकर आणि दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.