
व्हेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धा : श्याम लहाने, विनोद सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : १८व्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत कंबाइंड बँकर्स संघाने हायकोर्ट वकील संघाचा तीन विकेट राखून पराभव केला. दुसऱ्या सामन्यात एनआरबी संघाने कॉस्मो फर्स्ट इंडस्ट्रीज संघावर १४ धावांनी रोमांचक विजय नोंदवला. या सामन्यात श्याम लहाने आणि विनोद यांनी सामनावीर किताब संपादन केला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. कंबाइंड बँकर्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हायकोर्ट वकील संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १३१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात कंबाइंड बँकर्स संघाने १८.२ षटकात सात बाद १३३ धावा फटकावत तीन विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात पवन ईप्पर (६८), ज्ञानेश्वर पाटील (३०), इनायत अली (२६) यांनी शानदार फलंदाजी केली. गोलंदाजीत श्याम लहाने याने १३ धावांत चार विकेट घेत सामनावीर किताब पटकावला. संदीप सहानी (२-२२) व सचिन जैस्वाल (२-२३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात कॉस्मो फर्स्ट इंडस्ट्रीज संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एनआरबी संघाने प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकटात सर्वबाद १३७ धावसंख्या उभारली. कॉस्मो फर्स्ट इंडस्ट्रीज संघ या धावसंख्येचा पाठलाग करताना १८ षटकात १२३ धावांवर सर्वबाद झाला. एनआरबी संघाने १४ धावांनी रोमांचक विजय नोंदवला.
या सामन्यात सचिन शेडगे (४१), सनी राजपूत (३७) व रामेश्वर मतसागर (३३) यांनी धमाकेदार फलंदाजी केली. गोलंदाजीत विराज चितळे (३-१५), विनोद (३-२६) व भास्कर जीवरग (३-३२) यांनी प्रत्येकी तीन विकेट घेत सामना गाजवला.
संक्षिप्त धावफलक : हायकोर्ट वकील संघ : २० षटकात सात बाद १३१ (ज्ञानेश्वर पाटील ३०, संदीप सहानी ८, पवन ईप्पर नाबाद ६८, सय्यद दानियाल ७, अभिजीत विटोरे नाबाद ५, श्याम लहाने ४-१३, इम्रान अली खान २-३४, अभिषेक ठेंगे १-३०) पराभूत विरुद्ध कंबाइंड बँकर्स संघ : १८.२ षटकात सात बाद १३३ (इनायत अली २६, भूषण घोळवे १०, व्यंकटेश काणे २४, निखिल मुरुमकर ७, मिलिंद पाटील ५, इम्रान अली खान १३, श्याम लहाने नाबाद २१, अभिषेक ठेंगे नाबाद ५, इतर २२, संदीप सहानी २-२२, सचिन जैस्वाल २-२३, योगेश देशमुख १-१०, धीरज बहुरे १-१९, पवन ईप्पर १-२८). सामनावीर : श्याम लहाने.
२) एनआरबी : १८.३ षटकात सर्वबाद १३७ (सचिन शेडगे ४१, विनोद लंबे ९, शशिकांत पवार १०, महेश निकम १६, विरेंद्र थोटे २३, स्वप्नील मोरे १५, भास्कर जीवरग ३-३२, विराज चितळे ३-१५, रामाशिष २-३४, सनी राजपूत २-२३) पराभूत विरुद्ध कॉस्मो फर्स्ट इंडस्ट्रीज : १८ षटकात सर्वबाद १२३ (सनी राजपूत ३७, रामेश्वर मतसागर ३३, भास्कर जीवरग १३, अमोल नागरे ८, इतर २३, विनोद ३-२६, राहुल दांडगे २-२५, व्यंकटेश सोनवलकर २-३६, शशिकांत पवार २-१३, स्वप्नील मोरे १-१९). सामनावीर : विनोद.