
बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजन
छत्रपती संभाजीनगर : राज्य क्रीडा दिनानिमित्त बजाजनगर येथे बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित कबड्डी स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे भूमिपुत्र खाशाबा जाधव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ जागृत हनुमान मंदिर बजाजनगर या ठिकाणी करण्यात आले. कबड्डी स्पर्धा १४ व १७ वर्षांखालील मुले-मुली अशा दोन गटात घेण्यात आली.
महाराष्ट्राला कुस्ती या खेळात कांस्य पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे पहिले महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत. महाराष्ट्र शासनाने १५ जानेवारी हा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केला आहे. राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य क्रीडा दिन साजरा करण्याचे बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे हे दुसरे वर्ष आहे. कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, प्रसिद्ध उद्योजक हनुमान भोंडवे, वाळूज एमआयडीसी पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे, गजानन विद्या मंदिरचे अध्यक्ष आय जी जाधव, वेल डन कॉमर्स क्लासेसचे संचालक गोविंद गवळी, क्रीडा अधिकारी गणेश मायंदे, सामाजिक कार्यकर्ते कैलास भोकरे, गीते कोचिंग क्लासेसचे संचालक मिलिंद गीते, जागृत हनुमान मंदिरचे संचालक कोळी, रामेश्वर चायल, अनिल वांढेकर, राजू चव्हाण आणि प्रा. कैलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे,
या स्पर्धेसाठी वाळूज पंचक्रोशीतील विविध शाळा महाविद्यालयातील एकूण १८ शाळांनी सहभाग नोंदवला आहे. एकूण ५२ संघाचा सहभाग असून ६२४ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
या स्पर्धेत पंच म्हणून सुनील गोरे, नागेश्वर सावंत, संदीप राठोड, महेश भोवर, प्रशांत भांडे, अतुल चव्हाण, प्रसाद मगर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा कैलास जाधव, सचिव शेख शफी, कोषाध्यक्ष सी के जाधव, समाधान हराळ, प्रा नारायण शिंदे, दत्ता पवार, करण लघाने, अनिल शेरे, कृष्णा पवार, रामेश्वर वैद्य, अण्णा चव्हाण, ओमप्रकाश वाघमारे, नागेश कदम, धरमसिंग जारवाल, एस डी सदावर्ते, मोहन राठोड, आरती मॅडम यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले