
– श्रीकांत जोशी यांची निवड, उपाध्यक्षपदी पंकज भारसाखळे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी यांची प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या कार्याध्यक्षपदी तर पंकज भारसाखळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या वाट्याला पहिल्यांदाच हे पद श्रीकांत जोशी यांच्या रूपाने प्राप्त झाले आहे.

या संघटनेच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी विजयकुमार गौतम तर आंतरराष्ट्रीय पंच सतीश उचील यांची सचिवपदी फेरनिवड झाली. ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त आदिल सुमारीवाला हे संघटनेचे आजीवन अध्यक्ष असतील. नवी मुंबई येथील रिलायन्सच्या जिओ इन्स्टिट्यूट मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेची २०२५ ते २०२८ वर्षासाठीची संपूर्ण कार्यकारणी बिनविरोध निवडून आली. निवडणुकीला भारतीय ॲथलेटिक्स महासंघातर्फे डॉ. विकास प्रजापती निरीक्षक होते तर निवडणूक अधिकारी प्रताप पोटफोडे यांनी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेची २०२५ ते २०२८ ची कार्यकारणी जाहीर केली.
यात आजीवन अध्यक्ष : ऑलिम्पियन आदिल सुमारीवाला, अध्यक्ष: विजयकुमार गौतम, कार्याध्यक्ष : श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष : पंकज भारसाखळे, बाळाराम पाटील, राजे खंडेराय देशमुख, राजेश जाधव, अनिल बोंडे, गुरुदेव नगराळे, गणेश सिंहासने, सुनील जाधव, सचिव: सतीश ऊचील, कोषाध्यक्ष : प्रफुल पाटील मंगोरे, सहसचिव: दिनेश भालेराव, राजगुरू कोचाळे, सुरेश अडपेवार, रंजीत काकडे, संदीप ढोके, योगेश थोरबोले, अशोक आहेर, वैजनाथ काळे सदस्य: राकेश सावे, गजानन घुगे, चंद्रकांत पाटील, मयूर ठाकरे, सतीश मुंडे, चेतन शेंडे, रमेश बुट्टे, मिलिंद खिल्लारे.
तर विविध उपसमितीच्या अध्यक्षपदी ऑलिम्पियन ललिता बाबर, ऑलम्पियन कविता राऊत, ऑलिम्पियन आनंद मेनेझ, ऑलिम्पियन रचिता मिस्त्री यांची एकमताने निवड झाली.