
आंतर क्लब टेनिस स्पर्धा : सोलापूर संघ उपविजेता
सोलापूर : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना पुरस्कृत राज्यस्तरीय आंतर विभागीय आंतरक्लब लॉन टेनिस स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने ५ साखळी सामन्यात १६० पैकी १५५ गेम्स जिंकून विजेतेपद पटकावले.
सोलापूर संघाने १३९ गेम्स घेऊन उपविजेतेपद संपादन केले. या स्पर्धेत अमरावती (१३७ गेम्स), कोल्हापूर (९९), नाशिक (८२), नागपूर (७२) यांनी चमकदार कामगिरी बजावली.

स्पर्धेतील विजेत्या छत्रपती संभाजीनगर संघाला राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद संयुक्त सचिव शीतल भोसले यांच्या हस्ते १५ हजार रुपयांचे तर उपविजेत्या सोलापूर संघाला राज्य लॉन टेनिस संघटनेचे कार्यकारिणी सदस्य शिव मोर यांच्या हस्ते १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेत अमरावती, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर व सोलापूर या सहा विभागातून एकूण ४८ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी सामना पर्यवेक्षक म्हणून सुधीर सालगुडे तर व्यवस्थापक म्हणून संध्याराणी बंडगर यांनी काम पाहिले.
उपविजेता सोलापूर संघ : डॉ वीरेंद्र अतनूर, सिद्धार्थ गांधी, डॉ रविराज पवार, डॉ प्रणित नरळे, डॉ सूर्यप्रकाश कारंडे, राजीव देसाई, रुपेश बिद्री व डॉ अरुष शहा.