
ऑस्ट्रेलियन ओपन
मेलबर्न : भारताचा एन श्रीराम बालाजी आणि मेक्सिकोचा मिगुएल रेयेस वरेला या जोडीने रॉबिन हासे आणि अलेक्झांडर नेडोवयेसोव्ह यांना सरळ सेटमध्ये हरवून ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. बालाजी आणि मिगुल यांनी डच खेळाडू हासे आणि कझाकस्तानच्या अलेक्झांडरचा ६-४, ६-३ असा पराभव केला.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी प्रकारातून बाहेर पडणारा रित्विक बोलिपल्ली तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी रोहन बोपण्णा आणि युकी भांब्री यांनाही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. अमेरिकेच्या बोलिप्पल्ली आणि रायन सागरमन यांना सहाव्या मानांकित फिनलंडच्या हॅरी हेलिओवारा आणि ब्रिटनच्या हेन्री पॅटन यांनी ७-६, ६-१ असे पराभूत केले.
दरम्यान, पाच वेळा ग्रँड स्लॅम विजेती इगा स्वाएटेकने ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत रेबेका स्रामकोवाचा ६-०, ६-२ असा पराभव केला. आता तिचा सामना २०२१ च्या यूएस ओपन चॅम्पियन एम्मा रादुकानुशी होईल, जिने अमांडा अनिसिमोवाचा ६-३, ७-५ असा पराभव केला. त्याच वेळी, यूएस ओपन २०२४ च्या उपांत्य फेरीत खेळणाऱ्या एम्मा नवारोने चीनच्या वांग शियूचा ६-३, ३-६, ६-४ असा पराभव केला.
आता तिचा सामना तीन वेळा ग्रँड स्लॅम उपविजेत्या ओन्स जबेउरशी होईल, जिने दम्याचा सामना करत कॅमिला ओसोरियोचा ७-५, ६-३ असा पराभव केला. नवव्या क्रमांकावर असलेल्या डारिया कासाटकिनाने वांग याफानचा ६-२, ६-० असा पराभव केला, तर २४व्या क्रमांकावर असलेल्या युलिया पुतिन्त्सेवाने झांग शुईचा ६-२, ६-१ असा पराभव केला.