
राज्य क्रीडा दिन
नाशिक : भारताचे आणि महाराष्ट्राचे महान कुस्तीपटू ऑलिम्पियन खाशाबा जाधव यांचा १५ जून हा जन्म दिवस आहे. गेल्या वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने हा दिवस महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून घोषित केला आहे. या महाराष्ट्र क्रीडा दिनाच्या दिवशी नाशिकच्या दि एस एफ फाऊंडेशन, मराठा सेवा संघ, लाख मराठा प्रतिष्ठान आणि उत्तमराव ढिकले फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी आपले योगदान देणारे ६८ क्रीडा प्रशिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
नाशिकच्या जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे, क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते नाशिकच्या ६८ क्रीडा प्रशिक्षकांना आकर्षक चषक, गौरव पत्र आणि कॅलेंडर प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला नाशिकची सुवर्णकन्या सावरपाडा एक्सप्रेस, ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त कविता राऊत-तुंगार हिने भेट देऊन सत्कारार्थीना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात निमिष शेटे, तन्मय कर्णिक, भूषण भटाटे, उमेश सेनभक्त, अभिषेक मोहिते, विवेक सोनावणे, गणेश कलूगलं, गुलशन सिंग, आकाश अहिरे, प्रदीप ,राठोड, कुणाल शिंदे, मयूर गुरव, वैशाली मत्स्यागर, साहिल गुळवे, शैलेश रकिबे, सतीश बोरा, अंकुश सिंहा, शशिभूषण सिह, अफजल अन्सारी, निखिल राऊत, मयुरी भामरे, धनश्री कोंड, रितेश सोनावणे, अजय कंडारे, श्वेतांबरी माळी, आदित्य साबळे यांचा सत्कार करण्यात आला.
अशोक दुधारे यांनी प्रास्तविक केले. दीपक भदाणे यांनीही खाशाबा जाधव यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या क्षेत्रात प्रगती करावी असे सांगितले. आनंद चकोर यांनी सूत्रसंचालन केले.