‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे जिल्हा निवड चाचणी १८, १९ जानेवारीला

  • By admin
  • January 17, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

पुणे : अहिल्यानगर येथे होणाऱ्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची पुणे जिल्हा निवड चाचणी १८ व १९ जानेवारी रोजी कोंढवा बुद्रुक मधील कामठे मळा येथे होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके यांनी दिली.

या निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्यात असणाऱ्या ४५० हून अधिक कुस्तीगीरांमध्ये लढत रंगणार आहे. आमदार योगेश टिळेकर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस योगेश दोडके यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे.

मेघराज कटके म्हणाले, ‘बालगटात २५ किलो पासून ते ६० किलो पर्यंत चे १० वजनगट, वरिष्ट गटात गादी आणि माती विभागातील ५७ किलो पासून महाराष्ट्र केसरी किताबासह १० असे एकूण ३० वजन गटात कुस्तीगीरांचा सहभाग असणार आहे.

पुणे जिल्ह्यात वरिष्ठ कुस्तीगीरांसोबतच बालगटातील कुस्तीला चालना मिळावी यासाठी जिल्हा स्तरापर्यंत बाल कुस्तीगीर यांच्या कुस्त्या यावेळी कुस्ती शौकीनांना पाहायला मिळणार आहेत.

मुख्य आयोजक बाळासाहेब धांडेकर म्हणाले, माती आखाडा आणि गादी विभाग अशा पद्धतीने स्पर्धा होणार आहेत. विजेत्या खेळाडूंना पदक, चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *