
सोलापूर : सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचा खेळाडू पंचाक्षरी लोणार याने बेळगाव येथील मि इंडिया स्पर्धेत ७० किलो वजन गटात रौप्य पदक प्राप्त केले.
लोणार मॅक्सिमम जिमचा खेळाडू असून त्याला अन्वर शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस विशाल गायकवाड, संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल जाधव, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, संजय हिरेमठ, शशिकांत अक्कलवाडे, अविनाश गंजे, सहसचिव आतिक नदाफ यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.