
सोलापूर : शालेय शहर ड्राप रोबॉल स्पर्धेत उमाबाई श्राविका विद्यालयाने १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात उल्लेखनीय कामगिरी केली.
या सर्व खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांचे मार्गदर्शन लाभले. श्राविका संस्थेचे विश्वस्त यतीन शहा, अंजली शहा, डॉ रोहिणी शहा, अतुल शहा, अनिल जमगे, सीईओ देवई शहा, वरिष्ठ दिप्ती शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
उत्कृष्ट कामगिरी केलेले खेळाडू
१७ वर्ष मुले : तपन दास (द्वितीय). संभाजी शिंदे, आदित्य होनपारखे, आदित्य मुकुटकर, राजवर्धन घोडके (प्रथम). अथर्व साठे, हर्षवर्धन घोडके, राजवर्धन घोडके, कृष्णा दराडे (द्वितीय).
१७ वर्ष मुली : दिव्या कसबे (प्रथम). अनुष्का केत, प्रिया शिंदे (प्रथम). अनुष्का टोणपे, धनश्री होणपारखे, कृष्णाली पेंडकर (प्रथम).