विविध क्रीडा स्पर्धांनी जालना येथे राज्य क्रीडा दिन साजरा

  • By admin
  • January 17, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

जालना : जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सरस्वती भुवन प्रशाला येथे ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांना अभिवादन करण्यात आले.

सरस्वती भुवन प्रशाला येथे ऑलिपिंकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान व ‘देशात शांतता राहावी यात युवकांची कर्तव्ये’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महान कुस्तीपटु खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिलीपकुमार महाजन हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ॲड कांचन थोरवे, क्रीडा अधिकारी डॉ रेखा परदेशी, क्रीडा अधिकारी आरती चिल्लारे, विजय गाडेकर, रमेश थोरवे, उपमुख्याध्यापक दंडे, राहुल गायके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक हेमंत जोशी, किशोर नावकर, रमाकांत कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सवडे यांनी केले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्य क्रीडा दिनानिमित्त़ फुटबॉल, तलवारबाजी, टेनिक्वाईट स्पर्धा, लॉन टेनिस व रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, सुशील तौर, राम पाटील देठे, गोविंद पाटील ढवळे, ईस्माईल शेख, अमोल काटकर, गणेश पैंजणे, रोहण वाघमारे, पवन दांडगे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय तालीम संघ, जालना व भारत शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे राज्य क्रीडा दिनानिमित्त कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. या प्रसंगी डॉ दयानंद भक्त, शाम काबुलीवाला, चरण सले, रेखा परदेशी, आरती चिल्लारे, राहुल गायके, प्रदीप गायकवाड, विनय आस्कंद, बी यु शिंदे, हेमंत दायमाजी आदी उपस्थित होते. यावेळी विजयी कुस्तीपटूंना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *