जालना : जालना जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेतर्फे २१ जानेवारी रोजी जालना जिल्हा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या निवड चाचणीतून छत्रपती संभाजीनगर येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्य सॉफ्टबॉल ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जालना जिल्हा संघाची निवड करण्यात येणार आहे. जाफराबाद तालुक्यातील सिपोरा येथील ज्ञानसागर विद्यालयात २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त सॉफ्टबॉल खेळाडूंनी निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन सॉफ्टबॉल असोसिएशन जालनाचे अध्यक्ष डॉ भुजंगराव डावकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिव सोपान शिंदे (7875897377), सहसचिव एकनाथ सुरूशे (9011854192), प्रमोद खरात (7972899348), विकास काळे (7350590072) यांच्याशी संपर्क साधावा.