
पुणे : क्रीडा, शिक्षण आणि सार्वजिनक जीवनात समर्पित भावनेने आयुष्यभर स्वत:ला वाहुन घेणाऱ्या व्यक्तींना भाई नेवरेकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार वस्ताद गुलाबराव सोनावणे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती कोकणस्थ परिवार पुणेचे अध्यक्ष सुनील नेवरेकर यांनी दिली.
यापूर्वी हा पुरस्कार कै. नारायणराव पवार, डॉ मंजू जुगदर, अॅड विजय सावंत, प्रा लक्ष्मण देशमुख, प्रा नाना फटाले, अरविंद ठोंबरे, प्रा शाम करंदीकर, बाळासाहेब साने, प्रकाश रेणुसे, प्रा कुशाबा पिंगळे यांना प्रदान करण्यात आला आहे.
यंदाचा आठवा जीवनगौरव पुरस्कार राष्ट्रीय तालीम संघ पुणेचे विश्वस्त, माजी अध्यक्ष तसेच लोखंडे तालमीचे ८६ वर्षीय गुलाबराव सोनावणे यांना भाई नेवरेकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वस्ताद गुलाबराव सोनावणे गेली ६० वर्षे कुस्ती क्षेत्रात कार्यरत असून अनेक नामवंत कुस्तीपटूंना त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रकाश रेणूसे, नरेश पेडणेकर, श्रीनाथ हगवणे, पवन नेवरेकर, कोकणस्थ परिवार पुणेचे सचिव पराग गानू यांच्या निवड समितीने त्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.