
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि बळीराम पाटील हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ड्रॉप रोबॉल स्पर्धेत गांधेली येथील एमजीएम विद्याअरण्यम् संकुल संघाने घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ओम जैस्वाल (एकेरी), कार्तिक घोडके, कृष्णा घोडके, साजेद शेख, सार्थक खाडे (दुहेरी), वैभव जिवरग, कुणाल सोनवणे, रुषिकेश घोडके, राज खाडे, आदित्य शिंदे, चैतन्य कुबेर (तिहेरी) यांनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात मयुरी शिंदे (एकेरी), रुतुजा घोडके, वैष्णवी घोडके, राजनंदिनी पुरी, रिया ढोले (दुहेरी), दिव्या शिंदे, समृद्धी घोडके, प्रगती घोडके, वैष्णवी घोडके, शिवानी घोडके, प्रतिज्ञा खाडे (तिहेरी) या खेळाडूंनी आपल्या प्रकारात घवघवीत यश संपादन केले.
या शानदार कामगिरीबद्दल संचालिका पार्वती दत्ता, शाळेचे प्रशासक रमेश ठाकूर, मुख्याध्यापक पल्लवी त्रिभुवन, जिल्हा ड्रॉप रोबॉल संघटनेचे सचिव डॉ मुरलीधर राठोड यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. विजेते खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक कृष्णा पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.