
छत्रपती संभाजीनगर : यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय १७ वर्षांखालील मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने विविध विभागातील संघांना नमवून पुन्हा एकदा आपला ठसा उमटावत तिसरा क्रमांक पटकावला.
सलग दुसऱ्या वर्षी सर्वांची मक्तेदारी तोडत देवगिरी महाविद्यालयाचा संघ राज्यात पहिल्या तीनमध्ये आला आहे. या संघात आदित्य खांडेकर, अंशुमन सिंग, अंगद बाहेकर, राज मालकर, हर्षित लाटे, शंतनु रवी, योग श्राफ, युवराज कारवा, प्रियांशु सिंग, युवराज वाघ, अर्णव अग्रवाल, आयान शेख या खेळाडूंचा समावेश आहे.
या प्रसंगी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियमक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे, कार्यकारणी सदस्य त्र्यंकराव पाथ्रीकर, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य प्रा एन जी गायकवाड, उपप्राचार्य प्रा सुरेश लिपाने, उपप्राचार्य प्रा विजय नलावडे या सर्व मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या खेळाडूंना कनिष्ठ क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश खैरनार, प्रा शुभम गवळी यांनी मार्गदर्शन केले आहे. तसेच मंगल शिंदे, प्रा कृष्णा दाभाडे, प्रा अमोल पगारे, शेख शफीक यांचे सहकार्य लाभले आहे.