यंग संभाजीनगर व आरजी संभाजीनगरची आगेकूच

  • By admin
  • January 18, 2025
  • 0
  • 55 Views
Spread the love

मुकीम शेख, स्वप्नील चव्हाण, कुलदीप, स्वप्नील खडसेची चमकदार कामगिरी

रौप्य महोत्सवी नितीन चषक स्पर्धेचे क्रिकेट स्पर्धाॉ


सेलू : नितीन कला व क्रीडा युवक मंडळ यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत यंग संभाजीनगर आणि आरजी संभाजीनगर या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवली.

नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा होत आहे. तुलसी परभणी आणि यंग इलेव्हन संभाजीनगर असा सामना झाला. तुलसी परभणीने प्रथम फलंदाजी करताना‌ २० षटकात आठ बाद १५५ धावा केल्या. यात ‌निखिल मडस (३०), ‌प्रांजल पुरी (२६), ‌वेदांत जोशी (३०), जयदीप भराडे (२८) यांनी सुरेख फलंदाजी करत डावाला आकार दिला. यंग इलेव्हन संभाजीनगरच्या वतीने सय्यद सरफरोज याने २ गडी, ‌ आणि स्वप्नील चव्हाणने ३ गडी बाद केले.

यंग संभाजीनगर संघासमोर विजयासाठी १५५ धावांचे आव्हान होते. अक्सर संभाजीनगर संघाने १८ षटकात ‌सात बाद १५९ धावा फटकावत तीन विकेटने सामना जिंकला. यात ‌‌अमित पाठक (३३), स्वप्नील खडसे (४२), स्वप्नील चव्हाण (१६), नितीन (२६) यांनी धमाकेदार फलंदाजी करत संघास ३ गडी राखून विजय मिळवून दिला. तुलसी परभणीच्या वतीने कुलदीप पल याने ४ गडी बाद केले तर वेदांत जोशी व ‌रोहित भारत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला

दुसऱ्या सामन्यात असरार संभाजीनगर आणि आदर्श बीड असा सामना झाला. यात संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सहा बाद २१९ असा धावांचा डोंगर उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. यात ‌मुकीम शेख याने ९४ धावांची तुफानी खेळी केली. अंकुश पासवान (४२), विकास वाघमारे (३०) यांनी विजयात मोलाचे योगदान दिले. आदर्श बीड संघातर्फे मोसीन खान याने ३ गडी बाद केले तर गोपाळ गुरखुद्दीने १ गडी बाद केला.

आदर्श बीड संघ २१९ धावांचा पाठलाग करताना १५ षटकात १४६ धावांवर सर्वबाद झाला. यात समीर काटकर (२०), रुषिकेश सोनवणे (३९), देव नवले (२८), विकास वाघमारे (१५) यांनी झुंज दिली. संभाजीनगर संघाच्या वतीने प्रतीक भालेराव, यासीन शेख यांनी प्रत्येकी तीन-तीन गडी बाद करून संघाला ७३ धावांनी विजय मिळवून दिला.

प्रेक्षकांना सायकल बक्षीस

नितीन चषक क्रिकेट स्पर्धेतून प्रेक्षकांना सायकल लक्की ड्रॉ मधुन बक्षीस ठेवण्यात आले आहे. सायकलचे प्रायोजकत्व डॉ अशोक नाईकनवरे, डॉ बाळासाहेब जाधव, डॉ उमेश गायकवाड, नरसिंह ट्रॅव्हल्सचे मालक अनिल बप्पा डक, विलास पोळ, बंडूभाऊ देवधर, नारायणराव भिसे, गजानन गात, मिलिंद सावंत यांच्या हर्षवर्धन उद्योग समूहातर्फे देण्यात येत आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका प्रमुख बाबा काटकर अविनाश शेरे पांडुरंग कावळे, धनंजय कदम, राजेश राठोड, प्रमोद गायकवाड, दीपक निवाळकर, गजानन शेलार, कपिल ठाकूर, मसूद अन्सारी, अभिजीत चव्हाण, क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *