
पुणे : बहुप्रतीक्षित अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या द पूना क्लब गोल्फ लीग २०२५ स्पर्धेत १५ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा येरवडा येथील पुना क्लबच्या गोल्फ कोर्सवर होणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पूना क्लबचे अध्यक्ष व जॅग्वार्स संघाचे मालक गौरव गढोक म्हणाले की, ‘पूना क्लब गोल्फ लीग ही स्पर्धा पुण्याच्या गोल्फ स्पर्धा मालिकेच्या उच्च दर्जाचा मानदंड आहे. या स्पर्धेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील अव्वल खेळाडू आणि अन्य क्षेत्रातील अनुभवी खेळाडूबरोबरच हौशी गोल्फ पटू सुद्धा अशा स्पर्धेसाठी एकत्र येतात जेथे कौशल्य, सांघिक वृत्ती आणि खेळा वरील निष्ठा यांचा संगम होतो. यावर्षीच्या स्पर्धनिमित्याने स्पर्धात्मकता आणि बंधूभाव एकत्र आल्याचे पाहून मला अतिशय आनंद होत आहे.’
पूना क्लबचे उपाध्यक्ष आणि लीगचे कार्यकारी अध्यक्ष इंद्रनील मुजगुले म्हणाले की, पूना क्लब गोल्फ लीग ही केवळ एक स्पर्धा नसून विविध क्षेत्रातील नाते संबंध घडविण्याची आणि गोल्फ वरील सर्वांचे प्रेम एकत्रित रित्या साजरे करण्याची सुवर्ण संधीच आहे. एकूण १५ संघ आणि २४०पेक्षा अधिक खेळाडूंच्या सहभागामुळे यंदाची स्पर्धा अतिशय चुरशीची ठरेल यात शंका नाही.’
गोल्फ कोर्सचे कॅप्टन आणि शिर्के बर्डीज बँडिट्स संघाचे मालक जय शिर्के म्हणाले की, ‘ही लीग म्हणजे एक असे अभिनव व्यासपीठ आहे. जेथे केवळ गोल्फ मधील कौशल्याच्या स्पर्धात्मकतेप्रक्षाही खेळाडू आणि संघांमधील सहकार्य आणि बंधूभाव अधिक महत्वाचा ठरतो. एका अत्यंत दर्जेदार स्पर्धेचा अनुभव यामुळे आम्हाला मिळेल अशी आमची खात्री आहे.’
स्पर्धा संयोजन समिती सदस्य आदित्य कानिटकर म्हणाले की, ‘पूना क्लब गोल्फ २०२५ ही स्पर्धा संपूर्ण गोल्फ समुदायाच्या गोल्फ वरील निष्ठेचे आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करते..प्रत्येक संघाचा उत्साह आणि खिलाडूवृत्ती ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल अशीच आहे.’
स्पर्धेला ड्यूकॅटी लीगसी मोटर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून इरिगेशन प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड, टोरो, कोलते पाटील डेव्हलपर्स यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे. सहभागी संघ व संघमालक यामध्ये ऑटोमेक बेकर्स (अतिन आगरवाल), व्हॅस्कॉन द होली वन्स (वासुदेवन आर, अँड्र्यू पिंटो), शिर्के बर्डीज् बँडिट्स (जय शिर्के), एबी, जीजी अँड मनप्रीत जॅग्वार्स (मनप्रीत सिंग, अमित बोरा व गौरव गढोक), मानव पारी पिन सीकर्स (रुपेश बांठिया व रणजित दाते), इव्हेन्ट डायनमिक्स पार-टी टायगर्स (राकेश वाधवा व नासिर शेख), हिलियॉस ईगल्स (सलील भार्गव), अडवाणी सुपर किंग्ज (अनिल अडवाणी), पोलो वेल्थ अँड एजीज मेव्हरिक्स (विनय राठी व अभिजित गंगोली), केके रॉयल्स (अमित कोठारी), शुबान सनरायजर्स (यशवंत झांजगे), एरिस्टा फेअरवे टायटन्स (विजय अडवाणी), सेहगल ऍक्रोपॉलिज स्टार्स (निकी सेहगल, रुपल शहा), गेरा आऊटडोअर्स (कुमार गेरा), जिंजर्स (आनंद गंध, दिपाली शहा) यांचा समावेश आहे.