
मासिया प्रीमियर लीग : अजिंक्य पाथ्रीकर, दुर्गेश जोशी, नितीन पटेल सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये सान्या मासिया नाईट्स, कुरिया इलेव्हन आणि संत एकनाथ चार्टर्ड्स या संघांनी विजय साकारत आगेकूच केली. या सामन्यांत अजिंक्य पाथ्रीकर, दुर्गेश जोशी आणि नितीन पटेल यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.
एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात सान्या मासिया नाईट्स संघाने प्रथम फलंदाजी करत १५ षटकात आठ बाद ११६ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात धनंजय डॉमिनेटर्स संघ १५ षटकात आठ बाद १०१ धावा काढू शकला. सान्या मासिया संघाने १५ धावांनी सामना जिंकत आगेकूच केली.
या सामन्यात अजिंक्य पाथ्रीकर (३३), निखिल कदम (३०), अर्शद शेख (१६) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत कृष्णा कानगोळकर (३-१२), अजिंक्य पाथ्रीकर (२-२०), गिरीश खत्री (२-२६) यांनी प्रभावी स्पेल टाकत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात कुरिया इलेव्हनने लाइफलाइन मीडिया मॅव्हेरिक्स संघाचा तीन विकेट राखून पराभव केला. लाइफलाइन माडिया संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात सात बाद १११ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना कुरिया इलेव्हनने ११.१ षटकात सात बाद ११४ धावा फटकावत तीन गडी राखून सामना जिंकला.
या सामन्यात संदीप लांडगे (३५), अमोल शिंदे (३१), कैलास नखाते (२९) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. गोलंदाजीत दुर्गेश जोशी (३-३६), संदीप घनटे (२-५), गणेश ठाणगे (२-२०) यांनी सुरेख गोलंदाजी केली.
तिसऱ्या सामन्यात संत एकनाथ चार्टर्ड्स संघाने १५ षटकात चार बाद १६० अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एआयटीजी अॅव्हेंजर्स संघाने १५ षटकात नऊ बाद ११२ धावा काढल्या. संत एकनाथ संघाने ४८ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात मयंक विजयवर्गीय याने अवघ्या ३८ चेंडूत ७२ धावांची तुफानी खेळी केली. त्याने दोन उत्तुंग षटकार व दहा चौकार ठोकत सामना गाजवला. नितेश विंचूरकर (४४), नितीन पटेल (३२) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत नितीन पटेल याने १२ धावांत तीन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. नितेश विंचूरकर याने ३५ धावांत दोन विकेट घेत अष्टपैलुत्व सिद्ध केले. धनंजय वारुडीकर याने ४१ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : १) सान्या मासिया नाईट्स : १५ षटकात आठ बाद ११६ (निखिल कदम ३०, अजिंक्य पाथ्रीकर ३३, सुरज चामले १४, चैतन्य जाधव पाटील ५, मिलिंद कुलकर्णी ६, गजानन भानुसे नाबाद १०, प्रमेश माकडे नाबाद ६, कृष्णा कानगोळकर ३-१२, महेश फवाडे १-८, बापू कुबेर १-१९, मोहसिन शेख १-२४, अर्शद शेख १-३०) विजयी विरुद्ध धनंजय डॉमिनेटर्स : १५ षटकात आठ बाद १०१ (बापू कुबेर १६, मोहसिन शेख ९, राजू आमराव १०, अमोल मोगले १७, अर्जुन गवळी ११, अर्शद शेख १७, गिरीश खत्री २-२६, अजिंक्य पाथ्रीकर २-२०, गजानन भानुसे १-१७, नितीन कडवकर १-९, प्रमेश माकडे १-७). सामनावीर : अजिंक्य पाथ्रीकर.
२) लाइफलाइन मीडिया मॅव्हेरिक्स : १५ षटकात सात बाद १११ (संदीप लांडगे नाबाद ३५, तौसिफ जलाल खान ८, सत्यजीत घुगे २५, विजय भुजाडी ८, लक्ष्मण घुले ५, सचिन चव्हाण ८, अनिकेत गोरे ४, रवींद्र भेगडे २-२०, गणेश ठाणगे २-२०, कृष्णा पवार १-२२, संतोष मुंढे १-१३) पराभूत विरुद्ध कुरिया इलेव्हन : ११.१ षटकात सात बाद ११४ (निशांत आहेर ८, कैलास नखाते २९, रोहिदास पाटील १६, संतोष मुंढे ९, अमोल शिंदे नाबाद ३१, अमरी सागर ९, कुरिया जावेद ५, दुर्गेश जोशी ३-३६, संदीप घनटे २-५, विजय भुजाडी २-१६). सामनावीर : दुर्गेश जोशी.
३) संत एकनाथ चार्टर्ड्स : १५ षटकात चार बाद १६० (मयंक विजयवर्गीय ७२, अमोल खंदारे २१, नितीन पटेल नाबाद ३२, मोहम्मद नुमान अहमद २५, नितेश विंचूरकर २-३५, मधुकर इंगोले १-२३) विजयी विरुद्ध एआयटीजी अॅव्हेंजर्स : १५ षटकात नऊ बाद ११२ (गणेश जाधव १३, गौरव भोगले १७, नितेश विंचूरकर ४४, भागवत शेळके ११, सचिन कदम नाबाद ७, नितीन पटेल ३-१२, धनंजय वारुडीकर २-४१, मयंक विजयवर्गीय १-१०, शैलेश बेदमुथा १-३, केदार पांडे १-२६). सामनावीर : नितीन पटेल.