
शाळेचे दोन संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र
सोलापूर : अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या १७ व १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळविले. या दोन्ही संघांना एप्रिल २०२५ मध्ये नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
गोव्यातील पेडाम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अरिहंत स्कूलच्या २ संघाने सुवर्ण व एका संघाने रौप्य पदक पटकावले. स्कूलच्या खेळाडूंनी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, संघाना मागे टाकत प्रथम क्रमांक व सर्वात जास्त पदके मिळवण्याचाही मान मिळविला. आकाश मिस्कीन यांच्या नेतृत्वाखाली संघांनी दमदार कामगिरी करत यश संपादन केले. सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अजय पोन्नम, संस्थेच्या संचालिका सुलक्षणा पोन्नम, उपमुख्याध्यापिका तसनीम शेख, पर्यवेक्षिका रजनी सग्गम, चन्नेश इंडी आदींनी अभिनंदन केले.
विजेता १९ वर्षांखालील मुलांचा संघ : आर्यन याटकर, सोमेश चनमल, संतोष संगणगारी, भावेश अन्नम, विश्वराज डक्का, महेश टोणपे, पृथ्वीराज गोसावी, अथर्व बिराजदार, विघ्नेश बंदगी, श्रेयस सोलंकर, विश्वास पल्ली, श्रियस गालपेल्ली, श्रीनाथ अन्नम.
उपविजेता संघ : अथर्व देशमुख, ईश्वरचंद माचेरला, वैभव पाटील, सुमितराज मेरगू, महेंद्र मादास, प्रेम भोसले.
१७ वर्षांखालील मुलींचा विजेता संघ : श्रुती चन्ना, अक्षरा कांबळे, प्रियदर्शनी संगणगारी, हर्षदा पाटील, वैभवी जेटगी, अलेक्या भोसले.