
उंडणगाव मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर : स्नेह फाऊंडेशन आणि उंडणगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उंडणगाव मॅरेथॉन स्पर्धेत विशाल पांडे, प्रणिती हिकरे, कार्तिक चव्हाण, शकिला ढसावे, सचिन पावरा, आरती पावरा यांनी विजेतेपद पटकावले.

मॅरेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ दिनेश कुमार कोल्हे, अमोल ढाकणे व नामदेवराव चाफे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे उद्घाटन उंडणगावचे सरपंच लक्ष्मण पाटील व सुनीता लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी स्नेह फाउंडेशनचे डॉ राजेंद्र धनवई, डॉ जीत सिंग, डी डी लांडगे, रवींद्र पवार व अभय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
उंडणगाव मॅरेथॉन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, रावेर, बुलढाणा तथा हरियाणा येथील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. विजेता स्पर्धकांना रोख रक्कम देऊन व पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
मॅरेथॉनचा अंतिम निकाल
१४ वर्षांखालील मुले : १. विशाल पांडे (शेगाव), २. वसंता शिंदे (छत्रपती संभाजीनगर), ३. रामदेव दिवाकर (नाशिक), ४. दत्तात्रेय जगताप (जळगाव), ५. सनी कोळी (यावल), ६. सतीश बागुल (चाळीसगाव).
१४ वर्षांखालील मुली : १. प्रणिती हिकरे (अहिल्यानगर), २. आकांक्षा नरवडे (बाभुळगाव), ३. जानवी सपकाळ (रावेर), ४. पूनम सपकाळ (उंडणगाव), ५. अक्षरा वाघ (बाभुळगाव), ६. अमृता तुपे (बाभुळगाव).
१७ वर्षांखालील मुले : १. कार्तिक चव्हाण (जळगाव), २. अजय सैनी (हरियाणा ), ३. आर्यन शिंदे (अहिल्यानगर), ४. हर्ष पाटील (छत्रपती संभाजीनगर), ५. वैभव शिंदे (उज्जैन), ६. रोहन राठोड (पळशी).
१७ वर्षांखालील मुली : १. शकिला ढसावे (नंदुरबार), २. वर्षा कदम (परभणी), ३. जयश्री नरोडे (बाभुळगाव), ४. भाग्यश्री राजपूत (छत्रपती संभाजीनगर), ५. गायत्री जाधव (बाभुळगाव).
ओपन गट मुले : १. सचिन पावरा, २. रोहित सिन्नर, ३. कुलदीप पाटील, ४. प्रकाश धनावत, ५. सुनील सिंग, ६. साहिल कंबोज.
ओपन गट मुली : १. आरती पावरा, २. मनीषा पाडवी, ३. परिमला बाबर, ४. जानवी रोझोदे, ५. यमला पावरा.