पुणे येथे पहिली आशियाई तेक्क्येओन चॅम्पियनशिप रंगणार

  • By admin
  • January 20, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

बालेवाडी क्रीडा संकुलात २९ ते ३१ जानेवारी दरम्यान आयोजन 

पुणे : पहिली आशियाई तेक्क्येओन चॅम्पियनशिप २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा तेक्क्येओन या पारंपारिक कोरियन मार्शल आर्टसाठी आशियामध्ये एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे आणि संपूर्ण जगभरात त्याची ओळख वाढवण्यास मदत करणार आहे.

या चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासह दक्षिण कोरिया, नेपाळ, भूतान आणि हाँगकाँग या देशांतील ४०० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या इव्हेंटमध्ये तेक्क्येओन खेळाचे तंत्र, शारीरिक क्षमता आणि आंतरराष्ट्रीय क्रीडाशास्त्र यांचे उत्कृष्ट उदाहरण पाहायला मिळेल. या स्पर्धेसोबतच विविध संस्कृतींचा आदान-प्रदान होईल आणि तेक्क्येओनच्या जागतिक आकर्षणासोबतच त्याच्या लोकप्रियतेत वाढ होईल.

पहिल्या आशियाई तेक्क्येओन चॅम्पियनशिप स्पर्धेत अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यात प्रामुख्याने केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे,  केंद्रीय नागरी विमान वाहतूक निगम मंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल भाष्य करणार आहेत. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील सुधारणा आणि प्रगती या विषयावर चर्चा करतील. महाराष्ट्र तेक्क्येओन असोसिएशन अध्यक्ष आणि आमदार राजू भोले हे महाराष्ट्रातील तेक्क्येओन या खेळाच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.

दक्षिण कोरियाचे जू उंग्सेओ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. दक्षिण आशियाई तेक्क्येओन फेडरेशनचे महासचिव अॅड राज वागतकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र तेक्क्येओन असोसिएशनचे उपाध्यक्ष उमेश पाटील आणि स्पर्धा संचालक मिलिंद काटमोरे यांनी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *