
अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडवर २ धावांनी विजय
कोलालंपूर : पहिल्यांदाच टी २० विश्वचषक खेळत असलेल्या नायजेरिया संघाने शानदार कामगिरी केली आणि महिलांच्या १९ वर्षांखालील टी २० विश्वचषकात न्यूझीलंडला दोन धावांनी हरवून ऐतिहासिक विजय मिळवला.
पावसामुळे प्रभावित झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांना ७० धावाही करता आल्या नाहीत. पावसामुळे सामना १३-१३ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना नायजेरियाने १३ षटकांत सहा गडी गमावून ६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंड संघ निर्धारित षटकांत पाच गडी गमावून केवळ ६३ धावा करू शकला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
शेवटच्या षटकात पराभव
नायजेरियाला कमी धावसंख्येवर रोखल्यानंतर न्यूझीलंडने १२ षटकांत ५ बाद ५७ धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी एका षटकात नऊ धावांची आवश्यकता होती. नायजेरियाकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी लिलियन उडे आली आणि तिने पहिल्या चार चेंडूत चार धावा दिल्या. पाचव्या चेंडूवर एकही धाव झाली नाही, तर शेवटच्या चेंडूवर दोन धावा झाल्या आणि कर्णधार टॅश वॅकलिन जलद धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला.