
महाराष्ट्र क्रीडा दिन व कुणाल राजगुरू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पुणे : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणजेच महाराष्ट्र क्रीडा दिन व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष कुणाल राजगुरू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय बॉक्सिंग रेफ्री प्रशिक्षण शिबीर पिंपरी, पुणे येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय बॉक्सर राजेश यादव, राकेश यादव, संजय यादव व ज्येष्ठ पंच मनोहर इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, अहिल्यानगर जिल्हा व सोलापूर जिल्हा या पाच संघटनांच्या वतीने संयुक्तरित्या हा उपक्रम राबविण्यात आला. पाचही संघटनांच्या प्रशिक्षणार्थी रेफ्रींनी मोठ्या प्रमाणात या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला, असे पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष व या पंच प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक भरतकुमार व्हावळ यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार ॲड गौतम चाबुकस्वार व उपाध्यक्ष कुणाल राजगुरू यांच्या हस्ते शिबिरातील सर्व यशस्वी पंचांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, आंतरराष्ट्रीय पंच कॅप्टन सुरेश कदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते व पिंपरी चिंचवड बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय यादव, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कोच व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव विजय गुजर, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सहसचिव निलेश खुडे, अशोक गायकवाड व अनेक पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व पिंपरी चिंचवड शहर संघटनेचे सचिव विजय यादव यांनी आभार प्रदर्शन केले.