
नागपूर : अंडर २३ सी के नायडू ट्रॉफी सामन्यांसाठी विदर्भ संघाच्या कर्णधारपदी अनुभवी मोहम्मद फैज याची निवड करण्यात आली आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ निवड समितीने विदर्भाचा अंडर २३ क्रिकेट संघ जाहीर केला.
विदर्भ संघाचा सामना २५ ते २८ जानेवारी या कालावधीत राजस्थान संघाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर विदर्भ संघ मेघालय संघाशी खेळेल. हा सामना १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
विदर्भ संघात मोहम्मद फैज (कर्णधार), वरुण बिष्ट, श्री चौधरी, तुषार सूर्यवंशी, आशित सिंग, जगज्योत सिंग सासन, अभिषेक अग्रवाल, रोहित बिनकर, तेजस सोनी, संस्कार चव्हाटे, अर्जुन इंगळे, मनन अग्रवाल, गणेश भोसले, मिनार सहारे, गौरव फर्डे या खेळाडूंचा समावेश आहे.
या संघाच्या प्रशिक्षकपदी रणजीत पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सपोर्ट स्टाफमध्ये मोहम्मद हाशिम, आकाश अस्थाना, अजिंक्य सावळे, मोहम्मद साबीर यांचा समावेश आहे.