रेयॉन मासिया, किर्दक महावितरण, लाइफलाइन मीडियाची आगेकूच

  • By admin
  • January 20, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

मासिया प्रीमियर लीग क्रिकेट : रणजीत पाटील, योगेश जाधव, संदीप घनटे सामनावीर

छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत रेयॉन मासिया वॉरियर्स, किर्दक महावितरण चार्जर्स आणि लाइफलाइन मीडिया मॅव्हेरिक्स या संघांनी विजय साकारत आपली घोडदौड कायम ठेवली. या सामन्यांमध्ये रणजीत पाटील, योगेश जाधव आणि संदीप घनटे यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात दिग्विजय जीएसटी मार्व्हलस संघाने प्रथम फलंदाजी करत १५ षटकात चार बाद १४५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना रेयॉन मासिया वॉरियर्स संघाने १५ षटकात सहा बाद १४६ धावा फटकावत रोमांचक सामना चार विकेट राखून जिंकला.
या सामन्यात गणेश सिरसेवाड (५५), रणजीत पाटील (५३) यांनी आक्रमक अर्धशतके ठोकली. रणजीत पाटील याने सहा षटकार ठोकले. निकित चौधरी याने ४५ धावांची बहारदार खेळी साकारली. गोलंदाजीत संतोष राजपूत (२-१५), रणजीत पाटील (१-१७) व डोंगरे (१-१९) यांनी प्रभावी कामगिरी नोंदवली.
दुसऱ्या सामन्यात किर्दक महावितरण चार्जर्स संघाने सहा विकेट राखून विजय नोंदवला. या लढतीत मधुरा बिल्डर्स डायनॅमोज संघाने १५ षटकात सर्वबाद १०८ असे माफक लक्ष्य उभारले. किर्दक महावितरण चार्जर्स संघाने १२.१ षटकात चार बाद ११० धावा फटकावत सहज विजय साकारला.
या सामन्यात प्रमोद जाधव याने अवघ्या ३४ चेंडूत ७० धावांची धमाकेदार खेळी केली. प्रमोदने पाच टोलेजंग षटकार व सहा चौकार मारले. बाळासाहेब मगर (२४) व अजय देशमुख (१९) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत योगेश जाधव याने भेदक मारा करुन १७ धावांत सात विकेट घेतल्या. अक्षय ढवळे (२-२२) व अभय भोसले (१-१५) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.

तिसऱ्या सामन्यात लाइफलाइन मीडिया मॅव्हेरिक्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात नऊ बाद १३७ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एमआयडीसी रुषिकेश चॅलेंजर संघ १३.१ षटकात ११२ धावांत सर्वबाद झाला. लाइफलाइन मीडिया संघाने २५ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात अनिकेत गोरे (४८), स्वप्नील (३५), अनिल ठोकळ (२५) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत दुर्गेश जोशी (३-२१), संदीप घनटे (३-१६), राऊत राव (२-२६) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : १) दिग्विजय जीएसटी मार्व्हलस : १५ षटकात चार बाद १४५ (अंकुश नखाते ११, जालिंदर कदम १९, राहुल आमले १३, गणेश सिरसेवाड ५५, मयूर नाबाद २१, इंद्रज मीना नाबाद १३, संदीप पाटील १-३७, रणजीत पाटील १-१७) पराभूत विरुद्ध रेयॉन मासिया वॉरियर्स : १५ षटकात सहा बाद १४६ (रामेश्वर रोडगे ८, निकित चौधरी ४५, धर्मेंद्र वासानी १३, किरण जगताप ९, रणजीत पाटील नाबाद ५३, संदीप पाटील ६, संतोष राजपूत २-१५, डोंगरे १-१९, मयूर १-२९, गणेश सिरसेवाड १-४१). सामनावीर : रणजीत पाटील.

२) मधुरा बिल्डर्स डायनॅमोज : १५ षटकात सर्वबाद १०८ (अमरीश हौजवाला १७, अजय देशमुख १९, अक्षय पाटील ९, राहुल टोबरे १२, जयेश पाटील नाबाद १८, आलोक गोरडे १४, अभय भोसले १०, योगेश जाधव ७-१७, संजय बनकर १-२२, सिद्धार्थ १-११, रवी लोळगे १-११) पराभूत विरुद्ध किर्दक महावितरण चार्जर्स : १२.१ षटकात चार बाद ११० (बाळासाहेब मगर २४, प्रमोद जाधव नाबाद ७०, विलास राठोड ७, तुषार भोसले नाबाद ५, अक्षय ढवळे २-२२, अभय भोसले १-१५, समीर सोनवणे १-३०). सामनावीर : योगेश जाधव.

३) लाइफलाइन मीडिया मॅव्हेरिक्स : १५ षटकात नऊ बाद १३७ (दुर्गेश जोशी ११, संदीप लांडगे १४, अनिकेत गोरे ४८, अनिल ठोकळ २५, लक्ष्मण घुले ९, सत्यजीत घुगे नाबाद १२, इतर १५, राऊत राव ३-२६, कृष्ण जाधव २-२४, गणेश चव्हाण २-२२, विकास राऊत २-२६) विजयी विरुद्ध एमआयडीसी रुषिकेश चॅलेंजर : १३.१ षटकात सर्वबाद ११२ (बाळासाहेब काळे ९, नितीन कणिसे १३, स्वप्नील ३५, कृष्ण जाधव २२, संदीप हरणे १०, दुर्गेश जोशी ३-२१, संदीप घनटे ३-१६, लक्ष्मण घुले १-१६, सचिन चव्हाण १-११, विजय भुजाडी १-२७). सामनावीर : संदीप घनटे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *