मुंबई ओपन कराटे स्पर्धेत रुद्र अकादमीस १४ पदके

  • By admin
  • January 21, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

सोलापूर : कराटे इंडिया ऑर्गनायझेशन- किओ ची मान्यता असलेल्या इंडियन मार्शल आर्ट अॅकॅडमीतर्फे आयोजित मुंबई ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत रुद्र अकादमी व ट्रेडिशनल अँड स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या चौदा कराटे खेळाडूंनी कुमिते प्रकारात ५ सुवर्ण, ६ रौप्य, ३ कांस्य पदके पटकावून घवघवीत यश मिळवले.

विजेत्यांना आंतरराष्ट्रीय कराटेपटू भुवनेश्वरीने ऑनलाईन तसेच ए लेवल रेफ्री व प्रमुख प्रशिक्षक मिहिर संगीता सुरेश जाधव आणि आकाश झळकेनवरु यांनी ऑफलाईन प्रशिक्षण दिले असून विजेते स्पर्धक नवी पेठेतील शिवस्मारक व सात रस्ता मंत्री चंडक आयकाॅन शाखेत नियमित सराव करतात.

सुवर्ण पदक विजेते : आर्या यादव (संगमेश्वर काॅलेज), अक्षिता कुलकर्णी (एम पी एस), संकेत धन्नाईक (ए डी जोशी), कार्तिका गंधमल (आय एम एस), आयेशा हकीम (आय एम एस).

रौप्य पदक विजेते : अनुष्का पल्ली (एम पी एस),आदित्य पालिया (के एल ई), ओवी शिंदे (एस ई एस पाॅलिटेक्निक्स), सिद्धराज कुलकर्णी (संगमेश्वर पब्लिक स्कूल), अनुष्का लोकरे ( एल एफ सी), महमदी हकीम (आय एम एस).

कांस्य पदक विजेते : अर्णव माने (एन के ऑर्किड), अन्वी शिंदे (एल एफ सी), श्रेया वाघमारे (एल एफ सी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *