
छत्रपती संभाजीनगर : नाशिक येथे होत असलेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर सब-ज्युनिअर मुलांचा आणि वरिष्ठ गट संघ सहभागी झाला आहे.
या दोन्ही संघांना जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, जिल्हा थ्रो बॉल असोसिएशनचे गोकुळ तांदळे, डॉ उदय डोंगरे , राकेश खैरनार,प्रवीण शिंदे,भिकन अंबे, मोहन शिंदे,गणेश बेटूदे, सचिन बोर्डे,भीमा मोरे आदींनी शुभेच्छा दिल्या.
सब जुनिअर मुलांचा संघ : प्रणल राठोड ( कर्णधार), जयदीप दाभाडे, चेतन राठोड, राजवर्धन राठोड, प्रणव राठोड, पार्थ शिरसे, श्रेयस जाधव, आदित्य चापुले, पियुष जाधव,आदित्य वाकळे, आनंद विटेकर, भावेश चौधरी, आदित्य राठोड, गौरव घुगे. प्रशिक्षक : विशाल दांडेकर.
वरिष्ठ गट मुलांचा संघ : आरेफ शेख (कर्णधार), मंगेश साळवे, शेलमोन पवार, फिरोज शेख, अनिकेत शिंदे, सुरज चव्हाण, पवन इगवे, कुणाल नाईक, शैलेश कसबे. प्रशिक्षक : मोहन शिंदे.