
धुळे : शिरपूर येथील एच आर पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षिका मयुरी राजेश भामरे यांना नाशिक येथे एका भव्य कार्यक्रमात मराठा सेवा संघ, मराठा प्रतिष्ठान, उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन व डी एस एफ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त युवा क्रीडा प्रशिक्षकांचा पुरस्कार राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून देण्यात आला.
सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन मयुरी भामरे यांचा गौरव करण्यात आला. मागील काही वर्षांत क्रीडा शिक्षक म्हणून केलेली कामगिरीची दखल घेऊन तसेच युवा क्रीडा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार मयुरी भामरे यांना देण्यात आला.
या पुरस्काराबद्दल माजी शालेय शिक्षणमंत्री अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उद्योगपती चिंतन पटेल, संस्थेच्या सचिव रेषा पटेल, संस्थेचे विश्वस्त अतुलभाऊ भंडारी, विजय भंडारी, विजय अग्रवाल, स्पोर्टस इन्चार्ज प्रीतेश पटेल, संस्थेचे सीईओ डॉ उमेश शर्मा,अकॅडमीक इन्चार्ज पी व्ही पाटील, विद्यालयाचे प्राचार्य एस ए कुरेशी, पर्यवेक्षक सुनील पाटील, क्रीडा शिक्षक विजय सिसोदे यांनी मयुरी भामरे यांचे अभिनंदन व कौतुक केले.