
दोंडाईचा : नंदुरबार जिल्हा ओपन मॉन्टेक्स बॉल क्रिकेट असोसिएशनतर्फे जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे आयोजित राज्यस्तरीय मोन्टेक्स बॉल क्रिकेट स्पर्धेत हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज संघाने १२ वर्षांखालील गटात विजेतेपद पटकावले.
१२ वर्षांखालील गटातील विजेत्या संघात सिद्धार्थ गावित, विराज कोकणी, आरव वसावे, अर्जुन ठाकरे, आरुष गावित, आर्यन गावित, मयंक कोकणी, तन्मय गावित, अर्णव पाडवी, अंकित वळवी, शिवम वसावे, सिद्धार्थ कोकणी, निशांत वळवी, रुद्र भावसार, शौर्य सैदाणे या खेळाडूंचा समावेश आहे. विजेत्यांना सुवर्णपदक व ट्रॉफी, प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ आरुश गावित व ‘मॅन ऑफ द सिरीज’ शौर्य सैदाणेला ट्रॉफी व सुवर्ण पदक देवून सन्मानित करण्यात आले.
या यशस्वी खेळाडूंचे हस्ती शालेय समिती चेअरमन कैलास जैन, प्राचार्य राजेंद्र त्रिभुवन, प्राचार्य जीवन सपकाळे, उपप्राचार्य रजिया दाऊदी यांनी कौतुक व अभिनंदन केले. या यशस्वी क्रिकेटपटूंना हस्ती पब्लिक स्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख व प्रशिक्षक जितेंद्र सुरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.