
छत्रपती संभाजीनगरचा अव्यान घुमरे उपविजेता
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुहाना स्मार्ट राज्यस्तरीय १० वर्षांखालील टेनिस स्पर्धेत पुण्याच्या पालाश रुंचाडणी याने विजेतेपद पटकावले. छत्रपती संभाजीनगरचा अव्यान घुमरे याने उपविजेतेपद संपादन केले. मुलींच्या गटात पुण्याच्या रितिषा नेहे हिने अजिंक्यपद मिळवले.
१० वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात पुण्याच्या पालाश रुंचांडणी याने छत्रपती संभाजीनगरच्या अव्यान घुमरे याचा अंतिम फेरीत ४-२, ४-१ असा पराभव करून विजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात पुण्याच्या रितिषा नेहे हिने पुण्याच्या अन्वी साहू हिचा ४-१, ४-०0 असा सहज पराभव करून विजेतेपद मिळविले.
दोन्ही गटातील विजेत्या खेळाडूंना डॉ अतुल भालेराव यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रसंगी एन्ड्युरन्स टेनिस सेंटरचे प्रमुख आशुतोष मिश्रा, स्पर्धेचे सुपरवायझर प्रवीण गायसमुद्रे, राध्येश्याम अटफले, शंकर लबडे आणि शंकर भुल आदी उपस्थित होते.
अंतिम निकाल
अंतिम फेरी मुलांचा गट : पालाश रूचांदानी (पुणे) विजयी विरुद्ध अव्यान घुमरे (छत्रपती संभाजीनगर) ४-२, ४-१.
अंतिम फेरी मुलींचा गट : रितिषा नेहे (पुणे) विजयी विरुद्ध अन्वी साहू (पुणे) ४-१, ४-०.