
आयोजक आरती आशर, श्री गुजराती समाज मित्र मंडळाच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजन
जळगाव : उदयभाई वेद आणि निलेश आशर यांच्या स्मरणार्थ आयोजक आरती निलेश आशर तसेच जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि श्री गुजराती समाज मित्र मंडळ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी एक दिवसीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये खुल्या गटात प्रथम १५ व बेस्ट खान्देश, बेस्ट जळगाव ग्रामीण, बेस्ट व्हेटरन व वयोगट १९ याप्रमाणे प्रथम २ तसेच बेस्ट गर्ल /वुमन गटात प्रथम ५ यानुसार एकूण ३० हजार रुपयांची २८ रोख पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. तसेच एकूण ३५ ट्रॉफी ठेवण्यात आल्या आहेत.
तसेच वयोगट ७ मध्ये प्रथम ३ येणाऱ्या खेळाडूंना तर वयोगट ९, ११, १३, १३, १५, वयोगटात पहिले पाच क्रमांक येणाऱ्या खेळाडूंना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
ही बुद्धिबळ स्पर्धा सत्य वल्लभ भवन, रिंग रोड जळगाव येथे होणार आहे. स्पर्धकांनी नाव नोंदणी करिता आरती आशर (९५७९४३८८८९), परेश देशपांडे (९४२३५७२१७४), आकाश धनगर (9028275196), अभिषेक जाधव (73872 73157) यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन आयोजिक आरती निलेश आशर यांनी केले आहे.