
मासिया प्रीमियर लीग क्रिकेट : विश्वास प्रमोद, अमोल खंदारे, रवी लाखोले सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : मासिया प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये एक्स झोन स्कोडा वॉरियर्स, संत एकनाथ चार्टर्ड्स आणि प्रीमियम ट्रान्समिशन या संघांनी दणदणीत विजय नोंदवत आगेकूच कायम ठेवली. या सामन्यांमध्ये विश्वास प्रमोद, अमोल खंदारे आणि रवी लाखोले यांनी सामनावीर किताब संपादन केला.
एडीसीए क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. पहिल्या सामन्यात एक्स झोन स्कोडा वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करत १५ षटकात नऊ बाद १०५ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना कुरिया ११ संघ १५ षटकात सात बाद ७७ धावा काढू शकला. स्कोडा वॉरियर्स संघाने २८ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात दीपक जम्मुवाल (२४), शेख इद्रिस (२३) व कैलास नखाते (२२) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत विश्वास प्रमोद (३-१५) व गणेश ठाणगे (३-१८) यांनी प्रभावी स्पेल टाकत प्रत्येकी तीन गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात संत एकनाथ चार्टर्ड्स संघाने कॅनपॅक टायटन्स संघावर दहा विकेट राखून मोठा विजय संपादन केला. कॅनपॅक संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात नऊ बाद ६८ धावा काढल्या. संत एकनाथ चार्टर्ड्स संघाने अवघ्या ४.४ षटकात बिनबाद ७० धावा फटकावत दहा विकेट राखून दणदणीत विजय साकारला.
या सामन्यात मोहम्मद नुमान अहमद (३८), विशाल नहार (२८), अनूप (२१) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत नितीन पटेल (२-५), अमोल खंदारे (२-५) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात प्रीमियर ट्रान्समिशन संघाने प्रथम फलंदाजी करताना १५ षटकात सहा बाद १५७ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एंड्रेस हाऊसर ११ संघ १५ षटकात नऊ बाद ११० धावा काढू शकला. प्रीमियम ट्रान्समिशन संघाने ४७ धावांनी सामना जिंकला.
या लढतीत रवी लाखोले (७६), मुंढे (४६), निकेश कावळे (२०) यांनी आक्रमक फलंदाजी केली. गोलंदाजीत संतोष पांचाळ (३-१३), रवींद्र कुलकर्णी (३-२१) व शोएब (२-११) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : १) एक्स झोन स्कोडा वॉरियर्स : १५ षटकात नऊ बाद १०५ (संदीप राठोड १५, दीपक जम्मुवाल २४, शेख इद्रिस २३, प्रवीण नागरे ७, इतर १९, गणेश ठाणगे ३-१८, रवींद्र भेगडे १-२३, कैलास नखाते १-१८, अमोल शिंदे १-१९) पराभूत विरुद्ध कुरिया इलेव्हन : १५ षटकात सात बाद ७७ (कैलास नखाते २२, रोहिदास पाटील ९ सागर कापडे नाबाद २१, सुनील काकड ७, कृष्णा पवार नाबाद ६, विश्वास प्रमोद ३-१५, मोहन भुमरे १-२३, दीपक जम्मुवाल १-११, संदीप खोसरे १-९). सामनावीर : विश्वास प्रमोद.
२) कॅनपॅक टायटन्स : १५ षटकात नऊ बाद ६८ (वसीम १७, प्रशांत गोरे ६, अनूप २१, हंसराज राय ६, दशरथ भिवटे ८, अमोल खंदारे २-५, नितीन पटेल २-५, सुनील बघेले १-६, केदार पांडे १-११, धनंजय वारुडीकर १-१४, मयंक विजयवर्गीय १-१४) पराभूत विरुद्ध संत एकनाथ चार्टर्ड्स : ४.४ षटकात बिनबाद ७० (विशाल नहार नाबाद २८, मोहम्मद नुमान अहमद नाबाद ३८). सामनावीर : अमोल खंदारे.
३) प्रीमियम ट्रान्समिशन : १५ षटकात सहा बाद १५७ (रवी लाखोले ७६, मुंढे ४६, भूषण साबळे ४६, सचिन मिटकरी ६, शोएब ५, रवींद्र कुलकर्णी ३-२१, अमित क्षीरसागर २-२३) विजयी विरुद्ध एंड्रेस हाऊसर ११ : १५ षटकात ९ बाद ११० (निकेश कावळे २०, जलज चौधरी १८, जयेश पोकळे १०, अक्षय बाहेती ६, गणेश सोनवलकर १२, अभिजीत वैद्य १७, प्रशांत देशमुख १२, संतोष पांचाळ ३-१३, शोएब २-११, राहुल इंगळे २-२०, सुहास १-२५). सामनावीर : रवी लाखोले.