
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट मोनिका मनोजकुमार सिंग हिची २६ जानेवारी रोजी कर्तृत्वपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचालनासाठी निवड झाली आहे.
एनसीसीच्या निवडक कॅडेटची तुकडी या पथसंचालनात प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे व पंतप्रधानाना मानवंदना देत असते. या संचालनासाठी आयोजित पुणे येथील पूर्वतयारी निवड चाचणी शिबिरात मोनिका सहभागी झाली होती आणि त्यामधून तिची निवड झाली. मोनिका बीसीएस द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. ७ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, एनसीसी आणि देवगिरी महाविद्यालयासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
या निवडीबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, कर्नल संजू अय्यप्पा, कर्नल महुआ भट्टाचार्य, उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ विष्णू पाटील, डॉ अपर्णा तावरे, एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ सुलक्षणा जाधव आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.