
बीड : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने १४ वर्षांखालील मुलांचा क्रिकेट संघ जाहीर केला. या संघात बीडचा आक्रमक फलंदाज शौर्य शैलेश जाधव याची निवड करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याचा खेळाडू शौर्य शैलेश जाधव हा वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेटचा नियमित सराव करत आहे आणि त्याची मेहनत व प्रशिक्षक शेख अजहर, संजय धस, सागर सांगळे यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तथा बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी आमेर सलीम यांचा जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना असलेला खंबीर पाठिंबा यामुळे शौर्य याने महाराष्ट्र संघात आपले स्थान निर्माण केले आहे.
शौर्य जाधव याने प्रथम बीड जिल्हा संघाकडून खेळताना ९ सामन्यात सर्वाधिक ७६१ धावांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील पहिल्या पाच मुलांमध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यांनतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्वाधक धावा करणारे व गोलंदाजीत सर्वाधिक विकेट घेणारे अशा ८० मुलांची निवड करण्यात आली. या निवडलेल्या मुलांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सलेक्टर व कोच यांच्या समोर पाच सामने खेळवण्यात आले. यात सामन्यात शौर्य जाधव याने चार आर्धशतके करत २९७ धावा करुन दुसरे स्थान कायम राखले. फलंदाजीतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शौर्य जाधवचा समावेश महाराष्ट्र संघात करण्यात आला.
या निवडीनंतर बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव आमेर सलीम, राजन साळवी, इरफान कुरेशी, जावेद पाशा, रिजवान भाई, गोपाल गुरखुदे, नासेर मोमीन, शाहरूख पठाण, अतिक कुरेशी, निसार तांबोळी, सुनील वाघमारे, रोहित जाधव, मोहित परमार, चंद्रकांत हुरकूडे, संतोष कवटेकर, प्रकाश गालफाडे, सुदाम शेळके, बाबासाहेब गोरे, विजय पिव्हाळ, संजय कुलकर्णी, सखाराम घोडके, राजेश घनघाव यांच्यासह बीड जिल्हा वकील क्रिकेट संघाने शौर्यला शुभेच्छा देत महाराष्ट्र संघाकडून चांगले खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शौर्य जाधव याला ज्येष्ठ प्रशिक्षक अजहर शेख, संजय धस, सागर सांगळे, फिटनेस कोच नासेर मोमीन, राहुल जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.