
महेंद्र रंगारीला सुवर्णपदक
छत्रपती संभाजीनगर : जालना जिल्ह्यातील अंबड येथे छत्रपती योग व क्रीडा प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित राज्यस्तरीय सूर्यनमस्कार प्रशिक्षण व स्पर्धेत महेंद्र रंगारी याने सुवर्णपदक संपादन केले.
ही स्पर्धा मॉडर्न व्यायाम शाळा व सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि योग शिक्षक देवा चित्राल व क्रीडा भारती समन्वयक उदय कहाळेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या स्पर्धेत ४५० स्पर्धकांचा सहभाग होता. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाने घवघवीत यश संपादन केले.
या घवघवीत यशाबद्दल डॉ मीनाक्षी मुलीया, डॉ विवेक चर्जन, डॉ मनीषा चर्जन, रफिक जमादार, सुरेश मिरकर, छाया मिरकर, बाळकृष्ण खानविलकर, संजय जगताप, गोपाल पांडे, संकर्षण जोशी, किरण कुलकर्णी, रावसाहेब सांगळे, सतीश काळे, संदीप काळे, अनिता शिन्नरकर आदींनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.
सुवर्ण पदक विजेते
महेंद्र रंगारी, साईराम निंबेकर, ईशिता परदेशी, अर्चना यादव, संजय घोंगडे, कुणाल पिंपळे, जनक पतंगे, श्रावणी कोल्हे, शैला कोल्हे, शंतनू कोल्हे, विठ्ठल कोल्हे, वैजनाथ डोमाळे, सुनीता डोमाळे, विद्या ताकसांडे, जयमाला वाघमारे, राधा पारेख, राजश्री सिरोही, संध्या शिंदे, मधुकर चव्हाण, उत्तम ठोंबरे, हरिभाऊ पवार, प्रल्हाद तारगे, किशोरी कासार, शोभा बडगुजर, जयश्री बायस्कर.