
मुंबई : ठाणे येथे आयोजित १७व्या स्मित तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेत एक्सलन्ट तायक्वांदो अकादमीच्या खेळाडूंनी २१ सुवर्णपदक, ९ रौप्य पदक आणि ८ कांस्य अशी एकूण ३८ पदकांची कमाई करत चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत एक्सलन्ट तायक्वांदो अकादमीने उपविजेतेपद संपादन केले.
सेवेन स्क्वेअर अकॅडमी स्कूल, ठाणे येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. क्युरोगी (फायटिंग प्रकार) मध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमास पुजारी, स्मित तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष सुरेंद्र कांबळे, गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर उपस्थित होते. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील अकॅडमीतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यात एक्सलन्ट तायक्वांदो अकॅडमी मिरा रोड ठाणेच्या खेळाडूंनी ३८ पदकांची कमाई केली. एक्सलन्ट तायक्वांदो अकॅडमीच्या ३८ खेळाडूंनी सहभाग घेत २१ सुवर्णपदक, ९ रौप्यपदक आणि ८ कांस्यपदक मिळवून स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेचे प्रशिक्षक म्हणून गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
विजेत्या खेळाडूंचे मिरा-भाईंदर शिवसेना जिल्हा संघटक निशा नार्वेकर, उपशहर संघटक अर्चना कदम, विभाग संघटक कल्पना पाटील, विभाग संघटक शर्वरी सावंत, शाखा प्रमुख समीर साळवी, सतीश पाण्डेय, मनीष घाटबंधे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, सचिव मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष नीरज बोरसे, प्रवीण बोरसे, सुभाष पाटील, दुलिचंद मेश्राम, खजिनदार व्यंकटेश करा, अजित घारगे, सतीश खेमस्कर, एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीचे संस्थापक नीरज बोरसे, लता कलवार, ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलिल झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य प्रमोद कदम यांनी प्रशिक्षक गजेंद्र गवंडर, कांचन गवंडर व सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
क्योरुगी सुवर्ण पदक विजेते
खुशी तिवारी, श्रुतिका जाधव, जान्हवी जंगम, मंथन वापिलकर, शौर्य धुरी, प्रिशा शुक्ला, समर्थ त्रिपाठी, समृद्धी जाधव, विबा अग्रवाल, लेखा अगेडकर, स्वरा मोहिते, मोनिका थ्रुवा, अनुसया सुतार, कादंबरी कदम, युवान माडा, शौर्य गणवीर, काव्या गवंडर, सक्ष्म भारुड, वृषा, निष्का, अमृता कुलकर्णी.
क्योरुगी रौप्य पदक विजेता
पार्थ अगेडकर, किशन सुतार, विदिशा, क्षितिजा नादवडेकर, तन्मय कदम, अनशिका लोहार, युक्ती जंगम, राघवेंद्र कुलकर्णी, श्रुतिप्रज्ञान साहू.
क्युरोगी कांस्यपदक विजेता
प्रणील नादवडेकर, विक्रांत पांडे, अन्विता सावंत, विराज पांडे, जैत्रा, रुषिकेश कुलकर्णी, रामकृष्ण, नीती वेलानी.