
पुणे : ओल्ड मॉक्स स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या बुद्धिबळ स्पर्धेत अनिरुद्ध लिमये आणि नरहरी नाटेकर यांनी विजेतेपद पटकावले.
सदाशिव पेठ भागात ही स्पर्धा झाली. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे या स्पर्धेला तांत्रिक सहकार्य लाभले. ही स्पर्धा ५० ते ६० आणि ६० वर्षांवरील गट अशा दोन गटात घेण्यात आली. ३० आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह एकूण ६० खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. ६० वर्षांवरील गटात अनिरुद्ध लिमये आणि ५० ते ६० वयोगटात नरहरी नाटेकर यांनी विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत सर्वात ज्येष्ठ खेळाडू म्हणून एल पी खाडीलकर (८६ वय) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्यांना सेवानिवृत्त पोलिस आयुक्त डॉ माधवराव सानप यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. ओल्ड मॉक्स स्पोर्ट्स क्लबचे क्रीडा सचिव प्रकाश रेणुसे यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा संचालक राजेंद्र कोंडे यांनी सूत्रसंचालन केले. या स्पर्धेचे उद्घाटन नानासाहेब राऊत यांनी केले. या प्रसंगी जयसिंगराव मोहिते, रवींद्र फटाले, मोहनराव गोस्वामी, सुरेश देशपांडे आदी उपस्थिती होते. स्पर्धा संचालक म्हणून पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे आणि मुख्य पंच म्हणून ओंकार पासलकर यांनी काम पाहिले.
अंतिम निकाल
५० ते ६० वयोगट : १. नरहरी नाटेकर, २. प्रेमकुमार, ३. अनिल कुडाळ. उत्कृष्ट महिला खेळाडू : सुखदा सावरगावकर.
६० वर्षांवरील गट : १. अनिरुद्ध लिमये, २. लहुचंद ठाकूर, ३. मिलिंद भावे. उत्कृष्ट महिला खेळाडू : गगनदीप खन्ना.