
नागपूर : भोपाळ येथे एलएनसीटी युनिव्हर्सिटीमध्ये झालेल्या आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेमध्ये नागपूर विद्यापीठाचा महिला संघाने आठवा क्रमांक मिळवला.
या कामगिरीमुळे नागपूर विद्यापीठाचा महिला संघ खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमसाठी पात्र ठरला आहे. या संघामध्ये प्राची दिवे, सानिका आयरे, आर्या भोयर, शिवानी डुबले, अंशिका लाकडे व गौरी काळबांडे या खेळाडूंचा समावेश आहे.
या खेळाडूंना अरविंदबाबू देशमुख महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ मनोजकुमार वर्मा, नूतन भारत महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रणय सुखदेवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेलो इंडिया स्पर्धेकरिता महाराष्ट्र हौशी मल्लाखांब संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ अधिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा संचालिका डॉ विशाखा जोशी तसेच अरविंदबाबू देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश पवार व विद्यापीठाच्या सर्व प्राध्यापकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.